चंद्रावरील धूळ वाटते तितकी धोकादायक नाही!

नवीन संशोधनातून मोठा खुलासा
moon-dust-not-as-dangerous-as-thought
चंद्रावरील धूळ वाटते तितकी धोकादायक नाही!Pudhari File Photo
Published on
Updated on

सिडनी : चंद्रावरील धूळ मानवी आरोग्यासाठी वाटते तितकी हानिकारक नाही, असा निष्कर्ष एका नवीन अभ्यासातून समोर आला आहे. उलट, एखाद्या व्यस्त रस्त्यावरील प्रदूषित हवा श्वासावाटे आत घेणे, हे चंद्राची धूळ नाकात जाण्यापेक्षाही जास्त विषारी ठरू शकते, असे या अभ्यासात म्हटले आहे.

सिडनीतील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक ब्रायन ऑलिव्हर यांनी सांगितले की, ‘हे निष्कर्ष भविष्यात माणसाला चंद्रावर पुन्हा पाठवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि सुरक्षिततेच्या द़ृष्टीने पूरक आहेत.‘अपोलो मोहिमेदरम्यान चंद्रावरील धुळीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. कारण, ती विषारी असू शकते, असे मानले जात होते. चंद्रावर असलेल्या स्टॅटिक चार्जमुळे ही धूळ अंतराळवीरांच्या स्पेससूटला चिकटून बसत असे. जेव्हा अंतराळवीर आपल्या लँडरमध्ये परत येत, तेव्हा ही धूळ त्यांच्या श्वासावाटे आत जात असे. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, जो सुमारे 24 तासांनंतर कमी झाला.

‘अपोलो -17’ चे अंतराळवीर हॅरिसन श्मिट यांनी या त्रासाला ‘लुनार हे फीवर’ असे नाव दिले होते. यामध्ये डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे आणि वारंवार शिंका येणे यांसारख्या लक्षणांचा समावेश होता. पृथ्वीवर परतल्यानंतरही, अपोलो फ्लाईट सर्जन्सनी वापरलेले स्पेससूट उघडल्यावर त्यांनाही अशाच प्रकारच्या समस्या जाणवल्या. प्रत्येक मोहिमेनंतर परिस्थिती अधिकच बिघडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावरून असा अंदाज बांधण्यात आला की, चंद्राच्या धुळीच्या वारंवार संपर्कात आल्यास तिचा विषारीपणा वाढत जातो. याच पार्श्वभूमीवर, चंद्राच्या धुळीमुळे मानवाला होणार्‍या संभाव्य नुकसानीचे मोजमाप करण्यासाठी सिडनीतील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या रेस्पिरेटरी रिसर्च ग्रुपमधील पीएचडी विद्यार्थिनी मायकेला स्मिथ यांनी यावर अधिक संशोधन सुरू केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news