Spudcells Artificial Cells | मिनेसोटा विद्यापीठाच्या लॅबमध्ये तयार केल्या ‘स्पडसेल्स’ कृत्रिम पेशी!

Spudcells Artificial Cells |
Spudcells Artificial Cells | मिनेसोटा विद्यापीठाच्या लॅबमध्ये तयार केल्या ‘स्पडसेल्स’ कृत्रिम पेशी!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : संशोधकांनी आता प्रयोगशाळेत अनोख्या पेशी तयार केल्या आहेत. या पेशींच्या निर्मात्यांनी त्यांना ‘स्पडसेल्स’ असे नाव दिले आहे. ऐकायला हे नाव थोडे सामान्य वाटत असले, तरी ते एका अर्थाने कौतुकास्पदच आहे. बटाटा हा जसा घट्ट, कणखर आणि गुणकारी असतो, तसेच काहीसे यांचेही आहे. मात्र, युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा येथील शास्त्रज्ञ केट अदामाला यांच्या प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या या पेशी, त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर अत्यंत ‘कमकुवत’ आणि ‘अगतिक’ (असहाय्य) आहेत.

या कृत्रिम पेशींमध्ये स्वतःची अशी कोणतीही नैसर्गिक चयापचय क्रिया होत नाही. त्यामुळे जगण्यासाठी आणि वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या जवजवळ प्रत्येक गोष्टीसाठी या पेशींना एका विशेष प्रयोगशाळेतील कृत्रिम वातावरणावर अवलंबून राहावे लागते. या पेशींच्या 'डिझायनर डीएनए'च्या सात लूप्समध्ये केवळ वाढ आणि प्रजननासाठी जे प्रोग्राम्स कोड केले आहेत, ते फॉलो करण्यापलीकडे या पेशी स्वतःहून काहीही करत नाहीत. जरी या पेशी वरवर साध्या आणि कमकुवत वाटत असल्या, तरी विज्ञान जगतात मोठी क्रांती घडवण्यासाठी त्या सक्षम आहेत. निसर्गातील इतर सर्व सजीवांच्या किंवा घटकांच्या तुलनेत या पूर्णपणे वेगळ्या आहेत. आजवर जनुकीय नियंत्रणाखाली स्वतःची वाढ आणि पुनरुत्पादन करणारे जेवढे जीव पाहिले गेले आहेत, त्यांच्यापेक्षा या 'स्पडसेल्स' आणि त्यांचा कोणताही भाग हा पूर्णपणे वेगळा आणि मानवनिर्मित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news