Milky Way supermassive black hole | आकाशगंगेच्या मध्यभागात आढळले महाकाय कृष्णविवर

सर्वात तपशीलवार नकाशा; तारकांच्या जन्माचे रहस्य उलगडण्यास मदत
Milky Way supermassive black hole |
Milky Way supermassive black hole | आकाशगंगेच्या मध्यभागात आढळले महाकाय कृष्णविवर
Published on
Updated on

लंडन : आपल्या मिल्कीवे आकाशगंगेचा मध्यभाग ‘सेंट्रल मॉलेक्युलर झोन’ म्हणून ओळखला जातो. हा भाग पृथ्वीच्या आसपासच्या अवकाशापेक्षा अधिक दाट, उष्ण आणि अत्यंत अस्थिर आहे. या प्रदेशाच्या अगदी मध्यभागी सेजिटेरियस ए नावाचे महाकाय कृष्णविवर आहे. त्याचे वजन सूर्याच्या सुमारे 40 लाख पट असल्याचे वैज्ञानिक सांगतात. या कृष्णविवराच्या तीव्र गुरुत्वाकर्षणामुळे आसपासचे प्रचंड वायूढग त्याकडे ओढले जातात. लाँगमोर यांनी याची तुलना पाण्याच्या नळीतून वाहणार्‍या पाण्याशी केली आहे. जणू एखाद्या बाथटबमधील पाणी नळीत ओढले जात आहे.

विश्वाच्या अभ्यासात एक मोठी झेप घेत वैज्ञानिकांनी आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागाचा सर्वात तपशीलवार आणि उच्च-रिझोल्यूशन नकाशा तयार केला आहे. या नकाशामध्ये थंड वायूचे विशाल ढग स्पष्टपणे दिसून येतात. हाच थंड वायू म्हणजे तारे आणि ग्रह निर्माण होण्याचे मूळ कच्चे साहित्य असल्यामुळे या शोधामुळे आपल्या सौरमालेच्या उत्पत्तीबद्दल नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हा नकाशा तयार करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांनी तब्बल चार वर्षे संशोधन केले. या प्रकल्पासाठी चिलीतील अँडीज पर्वतरांगांवरील उंच पठारावर असलेल्या शक्तिशाली रेडिओ दुर्बिणींच्या समूहाचा अ‍ॅटाकेमा लार्ज मिलिमिटर/सबमिलीमीटर अ‍ॅरे वापर करण्यात आला. 50 हून अधिक रेडिओ अँटेना असलेल्या या वेधशाळेमुळे अंतराळातील सूक्ष्म संकेत पकडणे शक्य झाले.

या प्रकल्पाचे नेतृत्व स्टिव्हन लाँगमोअर यांनी केले. ते म्हणाले की, ‘आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागात नेमके काय घडते याचे इतके संपूर्ण चित्र यापूर्वी कधीच मिळाले नव्हते.’ आतापर्यंत वैज्ञानिकांनी आकाशगंगेतील वेगवेगळ्या भागांचे स्वतंत्र निरीक्षण केले होते. मात्र, या नव्या प्रकल्पामुळे संपूर्ण मध्यभागाचा एकत्रित नकाशा तयार झाला आहे. लाँगमोर यांच्या मते, हे जणू एखाद्या शहराच्या वेगवेगळ्या फोटोऐवजी त्याचा संपूर्ण नकाशा मिळाल्यासारखे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news