Europe Lake : दक्षिण युरोपमधील तलावात दुधाळ-हिरव्या रंगाचा भोवरा

अंतराळातून दिसले पृथ्वीचे विलोभनीय दृश्य
Europe Lake
दक्षिण युरोपमधील तलावात दुधाळ-हिरव्या रंगाचा भोवरा
Published on
Updated on

लंडन : दक्षिण युरोपमधील एका महाकाय तलावावर अंतराळातून एक अत्यंत दुर्मीळ आणि विलोभनीय नैसर्गिक दृश्य टिपण्यात आले आहे. तेथील एका विशाल 'क्रिप्टोडिप्रेशन' तलावाच्या पृष्ठभागावर दुधाळ-हिरव्या रंगाचा एक महाकाय भोवरा गोलाकार फिरताना दिसत आहे.

अंतराळातून घेतलेल्या उपग्रह छायाचित्रांमध्ये हा अवाढव्य दुधाळ-हिरवा भोवरा स्पष्टपणे नजरेस पडत आहे. 'क्रिप्टोडिप्रेशन' म्हणजे असा तलाव ज्याचा पृष्ठभाग समुद्राच्या पातळीच्या वर असतो; परंतु त्याचा तळ मात्र समुद्रसपाटीच्या खाली असतो. अशा वैशिष्ट्यपूर्ण तलावात तयार झालेला हा रंगीबेरंगी चक्राकार भोवरा वैज्ञानिक आणि अंतराळप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. वैज्ञानिकांच्या मते, पाण्याच्या पृष्ठभागावरील हा दुधाळ-हिरवा रंग तलावातील सूक्ष्म शेवाळ, खनिजे किंवा पाण्याखालील पाण्याच्या प्रवाहामुळे तयार झालेल्या गाळामुळे असू शकतो. वाऱ्याचा वेग आणि पाण्याच्या पाण्याच्या अंतर्गत प्रवाहाच्या हालचालींमुळे या रंगद्रव्यांनी एका विशाल चक्राकार भोवऱ्याचे रूप धारण केले आहे. उपग्रहाने टिपलेले हे छायाचित्र पृथ्वीवरील निसर्गाची अद्भु‌त रचना आणि अंतराळातून दिसणारे तिचे विलोभनीय सौंदर्य पुन्हा एकदा अधोरेखित करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news