Micro Robo: मिठाच्या कणापेक्षाही लहान ‌‘मायक्रो-रोबो‌’

विज्ञान क्षेत्रात एक मोठा चमत्कार
Micro Robo
Micro Robo: मिठाच्या कणापेक्षाही लहान ‌‘मायक्रो-रोबो‌’Pudhari
Published on
Updated on

वॉशिंग्टन : विज्ञान क्षेत्रात एक मोठा चमत्कार घडला आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया (UPenn) आणि युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन (UAM) च्या संशोधकांनी एक असा ‌‘मायक्रो-रोबो‌’ तयार केला आहे, ज्याचा आकार मिठाच्या कणापेक्षाही लहान आहे. ‌‘सायन्स रोबोटिक्स जर्नल‌’मध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनाने वैद्यकीयशास्त्राला एक नवी दिशा दिली आहे. हा जगातील पहिला असा लहान रोबो आहे, जो स्थिती अनुभवू शकतो, विचार करू शकतो आणि स्वतःच्या इच्छेने काम करू शकतो.

त्याच्या अत्यंत लहान शरीरात एक संगणक, मोटार आणि सेन्सर बसवण्यात आले आहेत. हा रोबो सौरऊर्जेवर चालतो आणि पोहण्यासाठी दोन इलेक्ट्रोडस्‌‍चा वापर करतो. संशोधक मार्क मिस्किन यांच्या मते, भविष्यात या रोबोंचा वापर मानवी शरीराच्या अशा भागांमध्ये औषध पोहोचवण्यासाठी केला जाईल, जिथे डॉक्टरांची साधने पोहोचू शकत नाहीत. तुटलेल्या पेशींना जोडण्यासाठीही हा रोबो मदत करेल.

हा रोबो सिलिकॉन आणि टायटॅनियमपासून बनवला गेला आहे आणि काचेसारख्या थराने झाकलेला आहे, जेणेकरून शरीरातील द्रवांमुळे तो खराब होऊ नये. सध्या हे तंत्रज्ञान प्राथमिक टप्प्यात आहे आणि मानवावर वापरण्यासाठी पूर्णपणे तयार नाही. वैज्ञानिक डेव्हिड ब्लाऊ यांचे म्हणणे आहे की, त्यांचा पुढील प्रयत्न या रोबोंना आपसात संवाद साधायला शिकवणे आहे, जेणेकरून ते एका टीमप्रमाणे एकत्र काम करून मोठ्या आजारांशी लढू शकतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news