Metabolism: रात्रीच्या अंधारामुळे नव्हे, ‌‘या‌’ कारणाने घटते चयापचय

अनेक लोकांचा असा समज असतो की, दिवस मावळून अंधार झाला की शरीराचा ‌‘मेटाबॉलिझम‌’ (चयापचय क्रिया) मंदावतो
Metabolism
Metabolism: रात्रीच्या अंधारामुळे नव्हे, ‌‘या‌’ कारणाने घटते चयापचयPudhari
Published on
Updated on

अनेक लोकांचा असा समज असतो की, दिवस मावळून अंधार झाला की शरीराचा ‌‘मेटाबॉलिझम‌’ (चयापचय क्रिया) मंदावतो. पण सत्य हे आहे की, रात्रीच्या वेळी शरीराच्या कार्य करण्याची पद्धत बदलते आणि आपल्या काही चुकीच्या सवयी या प्रक्रियेला अधिक संथ बनवतात. मेटाबॉलिझम ही अशी प्रक्रिया आहे जी शरीरातील अन्नाचे पचन करून त्याचे ऊर्जेत रूपांतर करते. दिवसा लोक जास्त सक्रिय असतात, त्यामुळे शरीर जास्त कॅलरीज्‌‍ जाळते. रात्री जेव्हा आपण विश्रांती घेतो, तेव्हा शरीराची ऊर्जेची गरज कमी होते आणि त्यामुळे मेटाबॉलिझम नैसर्गिकरित्या थोडा मंद होतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे खरी समस्या निर्माण होते.

जंक फूडचा धोका

मेटाबॉलिझम मंदावण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागून ‌‘जंक फूड‌’ खाणे. झोपण्यापूर्वी तळलेले, मसालेदार किंवा जास्त गोड पदार्थ खाल्ल्यास शरीर ते नीट पचवू शकत नाही. परिणामी, शरीरात चरबी साठू लागते आणि वजन वाढते. रात्रीच्या वेळी चिप्स, मिठाई किंवा कोल्ड ड्रिंक्स घेण्याच्या इच्छेमुळे अतिरिक्त कॅलरीज शरीरात जातात, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी गॅस आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.

अपुरी झोप आणि हार्मोन्सचा बिघाड

वजन वाढण्यामागे झोप पूर्ण न होणे हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे. कमी झोपल्यामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते, ज्यामुळे भूक जास्त लागते. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणे आणि झोपण्याची कोणतीही ठराविक वेळ नसणे याचा थेट परिणाम मेटाबॉलिझमवर होतो. शरीराला पुरेशी विश्रांती न मिळाल्यास वजन हळूहळू वाढू लागते. विशेषतः नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये ही समस्या प्रामुख्याने दिसून येते.

आरोग्य आणि जीवनशैली :

रात्रीच्या वेळी शारीरिक हालचाल कमी होण्याचा आपल्या प्रकृतीवर मोठा परिणाम होतो. जर तुमची जीवनशैली बैठी असेल आणि तुम्ही जेवल्यानंतर लगेच झोपत असाल, तर ते तुमच्या शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते. दिवसभर बसून काम करणे आणि रात्री जेवल्यानंतर कोणतीही हालचाल न करता थेट झोपायला जाणे, यामुळे शरीरातील कॅलरीज जळण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. यामुळे ‌‘मेटाबॉलिझम‌’ (चयापचय क्रिया) मंदावतो आणि वजन वाढण्याची शक्यता वाढते. म्हणूनच, रात्रीच्या जेवणानंतर किमान 15-20 मिनिटे हलकी वॉक (चालणे) किंवा स्ट्रेचिंग करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news