Men Heart Disease Risk | पुरुषांना हृदयविकाराचा धोका स्त्रियांच्या तुलनेत सात वर्षे आधीच

तज्ज्ञांनी दिला सावधानतेचा इशारा
Men Heart Disease Risk
Men Heart Disease Risk | पुरुषांना हृदयविकाराचा धोका स्त्रियांच्या तुलनेत सात वर्षे आधीच
Published on
Updated on

वॉशिंग्टन : पुरुषांमध्ये हृदयविकाराची लक्षणे स्त्रियांच्या तुलनेत साधारणपणे सात वर्षे आधी विकसित होतात, असे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे. प्रामुख्याने ‘कोरोनरी हार्ट डिसीज’मुळे हा फरक दिसून येत असून, पुरुषांमध्ये हा आजार स्त्रियांच्या तुलनेत तब्बल एक दशक आधी दिसून येतो.

‘जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशन’मध्ये 28 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेला हा अभ्यास 5,000 हून अधिक कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय प्रौढांच्या 30 वर्षांच्या निरीक्षणावर आधारित आहे. संशोधनानुसार, वयाच्या 35 व्या वर्षापासून पुरुष आणि स्त्रियांमधील हृदयविकाराच्या जोखमीमध्ये फरक पडण्यास सुरुवात होते. मध्यवयापर्यंत पोहोचताना पुरुषांमध्ये हा धोका सातत्याने जास्त असतो. धक्कादायक बाब म्हणजे, आहार, व्यायाम, धूम—पान, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल यांसारख्या घटकांचा विचार केल्यानंतरही पुरुषांमधील ही जोखीम जास्तच असल्याचे आढळले आहे.

संशोधनातील महत्त्वाचे मुद्दे : कोरोनरी हार्ट डिसीज : हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे होणारा हा आजार पुरुषांना लवकर ग्रासतो. अन्य घटक : केवळ जीवनशैलीच नाही, तर इतर काही जैविक किंवा सामाजिक घटक पुरुषांना तरुण वयात हृदयविकारासाठी अधिक असुरक्षित बनवत असावेत, असा संशोधकांचा अंदाज आहे. प्रतिबंधात्मक काळ : अनेक पुरुष मध्यमवयापर्यंत हृदयविकाराच्या तपासणीकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे प्रतिबंधाची महत्त्वाची संधी त्यांच्या हातून निसटते. हॅकेनसॅक मेरिडियन जर्सी शोर युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरचे कार्डिओलॉजी विभागप्रमुख डॉ. ब्रेट सीलोव्ह यांनी सांगितले की, ‘पुरुषांनी वयाच्या 30 व्या वर्षापासूनच नियमित हृदय तपासणी सुरू करणे आवश्यक आहे.

आहार, व्यायाम आणि धूम्रपान टाळण्यावर भर देऊन हा धोका कमी करता येऊ शकतो.’ तथापि, डॉ. सीलोव्ह यांनी नमूद केले की, या नवीन निष्कर्षांमुळे डॉक्टर किंवा रुग्णांनी वयाच्या 65 वर्षांपूर्वी महिलांना होणार्‍या हृदयविकाराच्या जोखमीकडे दुर्लक्ष करू नये. युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन हेल्थ फ्रँकेल कार्डिओव्हस्कुलर सेंटरचे संचालक आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ. किम ईगल यांनीही हीच चिंता व्यक्त केली आहे. या अभ्यासात सहभागी नसलेल्या डॉ. ईगल यांनी सांगितले की, ‘हा अभ्यास वैद्यकीय पद्धतींमध्ये बदल घडवणारा नाही आणि मला काळजी वाटते की, यामुळे अनेकजण असा निष्कर्ष काढू शकतात की हृदयविकार ही प्रामुख्याने केवळ पुरुषांचीच समस्या आहे.’ हृदयविकार हा अजूनही जगभरातील मृत्यूचे मुख्य कारण असून, वेळेवर केलेली तपासणी आणि जीवनशैलीतील बदल जीव वाचवू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news