world's youngest professor | जगातील सर्वात कमी वयाचा प्राध्यापक

world's youngest professor |
world's youngest professor | जगातील सर्वात कमी वयाचा प्राध्यापक
Published on
Updated on

वॉशिंग्टन : सामान्यतः ज्या वयात अनेक विद्यार्थी त्यांच्या कॉलेजच्या आयुष्याची सुरुवात करतात, त्या वयात अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या नेथन थॉमस यांनी आपल्याहून मोठ्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये शिकवून इतिहास रचला आहे. त्यांनी एका तरुण पुरुष प्राध्यापकाचा तब्बल ३०६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. नेथन थॉमस हे १८ वर्षे आणि ३४६ दिवस वयाचे असताना जगातील सर्वात तरुण पुरुष प्राध्यापक बनले असून, त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्‌मध्ये आपले नाव नोंदवले आहे.

सध्या ते मियामी डेड कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग इन्स्ट्रक्टर (अभियांत्रिकी प्राध्यापक) म्हणून कार्यरत आहेत, जिथे ते अशा विद्यार्थ्यांना शिकवतात जे वयाने साधारणपणे त्यांच्याच वयाचे किंवा त्यांच्यापेक्षा मोठे आहेत. नेथन थॉमस यांनी महान गणितज्ज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ कॉलीन मॅकलॉरिन यांचा विक्रम मोडला आहे. कॉलीन हे १७१७ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी प्राध्यापक बनले होते. हा विक्रम तब्बल ३०६ वर्षे कायम होता, जो आता नेथन थॉमस यांनी वयाच्या १८ वर्षे ३४६ दिवसांत मियामी डेड कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग शिकवण्याची नोकरी स्वीकारून आपल्या नावावर केला आहे.

थॉमस हे जगातील सर्वात कमी वयाची महिला प्राध्यापक असण्याचा विक्रम करणाऱ्या आलिया सबूर यांच्यापेक्षाही १६ दिवसांनी लहान आहेत. आलिया सबूर यांचा जन्म २२ फेब्रुवारी १९८९ रोजी अमेरिकेत झाला होता. त्यांनी वयाच्या १० व्या वर्षी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता आणि १४ व्या वर्षी अप्लाइड मॅथेमॅटिक्समध्ये (उपयोजित गणित) पदवी (बॅचलर डिग्री) मिळवली होती. त्या २००८ मध्ये, १८ वर्षे आणि ३६२ दिवस वयाच्या असताना दक्षिण कोरियाच्या सोल येथील कोनकुक युनिव्हर्सिटीच्या ॲडव्हान्स्ड फ्युजन विभागात प्राध्यापक बनल्या होत्या.

logo
Pudhari News
pudhari.news