medieval gold ring | नॉर्वेमध्ये सापडली निळ्या रत्नाची मध्ययुगीन सोन्याची अंगठी

medieval gold ring
medieval gold ring | नॉर्वेमध्ये सापडली निळ्या रत्नाची मध्ययुगीन सोन्याची अंगठी
Published on
Updated on

ओस्लो : दक्षिण नॉर्वेमधील एका मध्ययुगीन शहराच्या उत्खननादरम्यान एका महिला पुरातत्त्वशास्त्रज्ञाला अंगावर शहारे आणणारा अनुभव आला. त्यांना जमिनीखाली एक अत्यंत नाजूक सोन्याची अंगठी सापडली असून, त्यावर एक चमकदार निळे रत्न जडवलेले आहे.

नार्वेजियन इन्स्टिट्यूट फॉर कल्चरल हेरिटेज रिसर्चच्या पुरातत्त्वशास्त्रज्ञ लिंडा ओशेम यांनी आपला अनुभव सांगताना म्हटले की, ‘जेव्हा मला ही अंगठी दिसली, तेव्हा मला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तिथे काम करणार्‍या मजुरांनी माझी थट्टा तर लावली नाही ना, याची मला खात्री करून घ्यावी लागली.’ हा शोध नॉर्वेतील सर्वात जुने शहर मानल्या जाणार्‍या तॉन्सबर्गच्या मध्यवर्ती भागात लागला आहे. या शहराची स्थापना नवव्या शतकात झाली होती. ज्या ठिकाणी ही अंगठी सापडली, तिथे प्राचीन काळी स्कॅन्डिनेव्हियन राजांच्या ‘यंगलिंग’ राजवंशाचा राजवाडा होता. अंगठीवर अंडाकृती आकाराचे गडद निळे रत्न आहे. हे रत्न ‘नीलम’ असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोन्याच्या बारीक तारांपासून बनवलेली गुंतागुंतीची नक्षी आणि सोन्याचे छोटे मणी या अंगठीवर जोडलेले आहेत. ओस्लो विद्यापीठाच्या तज्ज्ञांनुसार, ही कलाकुसर 9 व्या ते 11 व्या शतकातील असावी. सोन्याच्या कामाची ही पद्धत मध्ययुगाच्या सुरुवातीला बायझँटाईन साम—ाज्यातून नार्वेमध्ये आली होती. संशोधकांच्या मते, ही अंगठी एका श्रीमंत आणि उच्चभ्रू घरातील स्त्रीची असावी. अंगठीचा आकार (50 ते 55 मि.मी. परीघ) पाहता ती अमेरिकन आकाराच्या 5.5 ते 7.5 या मापाची आहे. मध्ययुगात निळा नीलम हा केवळ संपत्तीचेच प्रतीक नव्हता, तर तो दैवी शक्ती, शुद्धता आणि काही आजारांवर उपचार करण्यासाठी देखील वापरला जात असे. हे रत्न खरा नीलम आहे की, कोबाल्टपासून बनवलेली काच, याचा शोध सध्या शास्त्रज्ञ घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news