Medieval diary discovery | जर्मनीतील 800 वर्षे जुन्या शौचालयात सापडली मध्ययुगीन ‘डायरी’

रेशमी टॉयलेट पेपर वापरताना पडल्याचा अंदाज
Medieval diary discovery |
Medieval diary discovery | जर्मनीतील 800 वर्षे जुन्या शौचालयात सापडली मध्ययुगीन ‘डायरी’
Published on
Updated on

बर्लिन : जर्मनीमध्ये पुरातत्त्वशास्त्रज्ञांना एका मध्ययुगीन शौचालयाच्या उत्खननादरम्यान कमालीच्या सुरक्षित अवस्थेत असलेली लाकूड आणि मेणापासून बनवलेली एक छोटी नोंदवही सापडली आहे. एका चामड्याच्या पिशवीत ठेवलेली ही 10 पानांची नोंदवही असून, त्यावर लॅटिन भाषेतील कर्सिव्ह हस्ताक्षर आहे. सुमारे 800 वर्षांपूर्वी एका मध्ययुगीन व्यापार्‍याने शौचास बसले असताना, बहुधा रेशमी टॉयलेट पेपरने स्वतःला स्वच्छ करत असताना ही वही तिथे पडली असावी, असा अंदाज संशोधकांनी वर्तवला आहे.

‘रीजनल असोसिएशन ऑफ वेस्टफेलिया-लिप्पे’ (LWL) ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, उत्तर जर्मनीतील पाडेरबॉर्न शहरात एका नवीन इमारतीच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना हे ऐतिहासिक अवशेष सापडले. पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी या ठिकाणी पाच मध्ययुगीन शौचालयांचे उत्खनन केले. ही शौचालये पूर्णपणे बंद आणि हवाविरहित असल्याने, एरवी सडून नष्ट होणार्‍या अनेक सेंद्रिय वस्तू तिथे सुरक्षित राहिल्या. प्रयोगशाळेत या वस्तूंची नेहमीप्रमाणे स्वच्छता सुरू असताना, तज्ज्ञांच्या लक्षात आले की, मातीचा एक साधा गोळा वाटणारी ती वस्तू प्रत्यक्षात झाकण असलेली चामड्याची एक छोटी पिशवी होती. LWL च्या संरक्षिका सुझान ब—ेटझेल यांनी सांगितले की, ‘इतकी शतके जमिनीत गाडली गेल्यानंतरही, शौचालयातून सापडलेल्या या वस्तूला अजूनही एक प्रकारचा उग्र आणि अप्रिय वास येत होता.‘

ही छोटी नोंदवही साधारण 3.4 बाय 2.2 इंच (8.6 बाय 5.5 सेंटीमीटर) आकाराची आहे. ती ठेवण्यासाठी बनवलेल्या चामड्याच्या पिशवीवर ‘फ्लूर-डी-लिस’ म्हणजेच लिलीच्या फुलाची नक्षी कोरलेली आहे. या लाकडी वहीची 8 पाने दोन्ही बाजूंनी, तर 2 पाने एका बाजूने वापरण्यायोग्य आहेत. या सर्व पानांवर मेणाचा थर लावलेला होता, ज्यावर टोकदार लेखणीने लिहिता येत असे. या नोंदवहीच्या आत तज्ज्ञांना लॅटिन कर्सिव्ह कथेच्या अनेक ओळी सापडल्या आहेत. काही ओळी एकावर एक आणि वेगवेगळ्या दिशांनी लिहिलेल्या असल्याने त्याचे भाषांतर करणे अत्यंत कठीण जात आहे. LWL च्या पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि सांस्कृतिक व्यवहार प्रमुख बार्बरा रशॉफ-पार्झिंगर म्हणाल्या, ‘काही सुटे शब्द ओळखता येत आहेत, परंतु संपूर्ण मजकुराचे लिप्यंतर करण्यासाठी वेळ लागेल. कारण, काही शब्दांचे स्पेलिंग चुकीचे असू शकते.’ अक्षरांच्या रचनेवरून आणि वैशिष्ट्यांवरून, हे पुस्तक 13 व्या ते 14 व्या शतकाच्या उत्तरार्धाच्या दरम्यान वापरले गेले असावे, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news