Asteroid Apophis | पृथ्वीच्या दिशेने येतोय मोठ्या आकाराचा ‘एस्टेरॉयड एपोफिस’

Asteroid Apophis |
Asteroid Apophis | पृथ्वीच्या दिशेने येतोय मोठ्या आकाराचा ‘एस्टेरॉयड एपोफिस’
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अंतराळातून एक अवाढव्य लघुग्रह अतिशय वेगाने पृथ्वीच्या दिशेने चालून येत आहे. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, हा लघुग्रह पृथ्वीच्या इतक्या जवळून जाणार आहे की त्याची माहिती ऐकूनच अंगावर काटा येऊ शकतो. ‘९९९४२ एपोफिस’ (99942 Apophis) असे नाव असलेला हा लघुग्रह १३ एप्रिल २०२९ रोजी पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल. या वेळी त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर अवघे ३२,००० किलोमीटर असेल. हे अंतर पृथ्वी आणि चंद्रामधील सरासरी अंतराच्या (३,८४,००० किमी) दहाव्या भागापेक्षाही कमी आहे. या विनाशकारी लघुग्रहाचे नाव प्राचीन इजिप्शियन प्रलयाच्या देवतेवरून ‘एपोफिस’ ठेवण्यात आले आहे.

‘स्पेस डेली’च्या अहवालानुसार, पृथ्वीचे जिओ-स्टेशनरी उपग्रह हे जमिनीपासून सुमारे ३५,७८६ किलोमीटर उंचीवर फिरत असतात. त्यामुळे ‘एपोफिस’ जेव्हा पृथ्वीच्या जवळून जाईल, तेव्हा तो या उपग्रहांच्याही आतून म्हणजेच उपग्रहांपेक्षाही जास्त जवळून प्रवास करेल. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने स्पष्ट केले आहे की, इतक्या जवळून जाऊनही हा लघुग्रह पृथ्वीवर धडकण्याची कोणतीही शक्यता नाही. मात्र, या जवळिकीमुळे या लघुग्रहावर अत्यंत आश्चर्यकारक नैसर्गिक बदल घडणार आहेत.

नासाचे ‘OSIRIS-APEX’ हे अवकाशयान या लघुग्रहावर बारीक लक्ष ठेवून असेल आणि या प्रवासादरम्यान होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी त्याच्या अगदी जवळ पोहोचेल. नासाने दिलेल्या माहितीनुसार पृथ्वीचे प्रचंड गुरुत्वाकर्षण एपोफिसची मूळ भ्रमणकक्षा किंचित वाकवेल. यामुळे त्याच्या स्वतःभोवती फिरण्याच्या पद्धतीत बदल होईल. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे या लघुग्रहाच्या पृष्ठभागावरील खडक आणि ढिला झालेला भाग हादरून हलू शकतो. एपोफिसचा सरासरी व्यास सुमारे ३४० मीटर आहे. एवढ्या मोठ्या आकाराचा लघुग्रह पृथ्वीच्या इतक्या जवळून जाण्याची मानवी इतिहासातील ही पहिलीच नोंदवलेली घटना ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news