Mars Spider Web Discovery | मंगळावर आढळले अजस्र ‘कोळिष्टक’!

‘नासा’च्या क्युरिऑसिटी रोव्हरने टिपले रहस्यमय ’अंडी’ सद़ृश दगड
Mars Spider Web Discovery |
Mars Spider Web Discovery | मंगळावर आढळले अजस्र ‘कोळिष्टक’!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : ‘नासा’च्या क्युरिऑसिटी रोव्हरने मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर पसरलेल्या एका विशाल ‘कोळिष्टका’सारख्या संरचनेचे चित्तवेधक फोटो काढले आहेत. यातील एका फोटोमध्ये अंड्यासारखे गोलाकार दगड दिसून आले असून, शास्त्रज्ञ सध्या त्यांच्या निर्मितीचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहेत.

गेल्या 8 महिन्यांपासून क्युरिऑसिटी रोव्हर ‘गेल क्रेटर’मधील माऊंट शार्पच्या उतारावर असलेल्या एकमेकांशी जोडलेल्या खडकाळ रांगांचा अभ्यास करत आहे. याला ‘बॉक्सवर्क’ असे नाव देण्यात आले आहे. सुमारे 20 किलोमीटर परिसरात पसरलेल्या या रांगा अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळाच्या पृष्ठभागाखालील भूजलामुळे तयार झाल्या असाव्यात, असा अंदाज आहे. 2006 मध्ये पहिल्यांदा उपग्रहाद्वारे या रांगा दिसल्या होत्या. मात्र, प्रथमच एखादे यान इतक्या जवळून त्यांचा अभ्यास करत आहे. शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की, हे ‘कोळिष्टक’ म्हणजे मंगळावर दिसणारे प्रसिद्ध ‘स्पायडर’ नव्हेत.

ते ‘स्पायडर’ कार्बन डायऑक्साईडचा बर्फ वितळल्यामुळे तयार होतात. याउलट, ‘बॉक्सवर्क’ हे खनिजांनी समृद्ध असलेल्या खडकांच्या एकमेकांना छेदणार्‍या रांगा आहेत. सोमवारी (23 फेब्रूवारी) ‘नासा’ने प्रसिद्ध केलेल्या फोटोंमध्ये या संरचनेचे सूक्ष्म तपशील समोर आले आहेत : खडकाळ भिंती : जमिनीपासून या रांगांची उंची 3 ते 6 फूट आहे.

विचित्र ढेकूळ : 21 ऑगस्ट रोजी काढलेल्या एका क्लोज-अप फोटोमध्ये या रांगांवर लहान, अनियमित आकाराचे ढेकूळ किंवा ‘अंडी’ सद़ृश गोलाकार भाग दिसून आले आहेत. असे भाग यापूर्वी कधीही पाहिले गेले नव्हते.

परसेव्हरन्सशी संबंध : हे गोलाकार भाग गेल्या वर्षी ‘परसेव्हरन्स’ रोव्हरला जेझेरो क्रेटरमध्ये आढळलेल्या रहस्यमय ‘स्पायडर एग’ दगडासारखेच दिसत आहेत. राईस युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञ टीना सीगर यांनी सांगितले की, ‘हे गोलाकार भाग तिथेच का तयार झाले, याचे स्पष्टीकरण आमच्याकडे सध्या नाही. कदाचित प्रथम खनिजांमुळे रांगा तयार झाल्या असाव्यात आणि नंतर भूजलाच्या प्रवाहामुळे त्यांच्याभोवती हे गोलाकार भाग जमा झाले असावेत.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news