Mars Atmosphere | मंगळाचे वातावरण टूथपेस्टसारखे दाबले जातेय!

खगोलशास्त्रज्ञांचा दावा
Mars Atmosphere |
Mars Atmosphere | मंगळाचे वातावरण टूथपेस्टसारखे दाबले जातेय!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : मंगळ ग्रहाचा अभ्यास करणार्‍या खगोलशास्त्रज्ञ आणि संशोधकांना एक अत्यंत अवाक् करणारी माहिती मिळाली आहे. एका अनपेक्षित नैसर्गिक प्रभावामुळे मंगळ ग्रहाचे वातावरण एखाद्या ‘टूथपेस्ट’सारखे दाबले जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या आश्चर्यकारक शोधामुळे शास्त्रज्ञही चक्रावून गेले असून, ‘मी असा अंदाज कधीच लावला नसता,’ अशी प्रतिक्रिया एका आघाडीच्या तज्ज्ञाने दिली आहे.

मंगळ ग्रहाभोवती असलेले वातावरण आधीच खूप विरळ आहे. मात्र, अंतराळातून येणारे सौर वारे आणि मंगळाचे चुंबकीय क्षेत्र यांच्यात होणार्‍या एका विशिष्ट आणि अनपेक्षित प्रक्रियेमुळे या वातावरणावर प्रचंड दबाव निर्माण होत आहे. हा दबाव एखाद्या टूथपेस्टच्या ट्यूबला दाबल्यावर जसा परिणाम होतो, तशाच प्रकारे मंगळाच्या वातावरणातील वायूंना बाहेर ढकलत आहे किंवा त्यांना संकुचित करत आहे. या संशोधनात सामील असलेल्या तज्ज्ञांनी सांगितले की, मंगळाच्या वातावरणात होणारे हे बदल अत्यंत वेगळे आहेत. यापूर्वी उपग्रहांद्वारे मिळालेल्या डेटाच्या आधारे असा कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नव्हता. या अनपेक्षित प्रभावामुळे मंगळावरील वायू अंतराळात कशा प्रकारे नाहीसे होत आहेत किंवा त्याचे वातावरण भूतकाळात कसे बदलले, हे समजून घेण्यास मदत होणार आहे. मंगळावर कधीकाळी पाणी किंवा पूरक वातावरण होते का, यावर संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञांसाठी हा शोध अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, यामुळे लाल ग्रहाच्या अनेक रहस्यांवरून पडदा उठण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news