Viral Stunt Incident | शेजार्‍यांचं भांडण पाहण्यासाठी काकांचा खतरनाक ‘स्टंट’!

Viral Stunt Incident |
Viral Stunt Incident | शेजार्‍यांचं भांडण पाहण्यासाठी काकांचा खतरनाक ‘स्टंट’!
Published on
Updated on

मुंबई : सोशल मीडियावर दररोज असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे लोकांना थक्क करण्यासोबतच पोट धरून हसण्यासही भाग पाडतात. सध्या इंटरनेटवर असाच एक मजेदार व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या शेजाऱ्यांच्या घरात चाललेलं भांडण पाहण्यासाठी असा काही धोका पत्करताना दिसतेय, जे पाहून लोक अवाक्‌‍ झाले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून, यूजर्स यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका इमारतीत दोन शेजाऱ्यांमध्ये जोरदार वाद सुरू असल्याचं दिसत आहे. भांडणाचा आवाज आजूबाजूला स्पष्ट ऐकू येत असला, तरी नक्की काय चाललंय हे पूर्णपणे समजत नव्हतं. दरम्यान, शेजारीच राहणाऱ्या एका ‌‘काकां‌’ची उत्सुकता इतकी वाढली की, त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही. शेजाऱ्यांच्या घरात काय सुरू आहे, हे पाहण्यासाठी ते थेट आपल्या घराच्या खिडकीतून बाहेर आले आणि कसरत करीत शेजाऱ्यांच्या घराकडे डोकावू लागले. हे काका खिडकीचा आधार घेऊन अत्यंत धोकादायक पद्धतीने बाहेर लटकले होते. विशेष म्हणजे त्यांच्या हातात एक मोबाईल फोनही दिसत आहे, ज्यामधून ते शेजाऱ्यांच्या भांडणाचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करत आहेत.

व्हिडीओ पाहताना काही सेकंदांसाठी असं वाटतं की, एक लहानशी चूकही त्यांच्यासाठी गंभीर अपघाताला कारणीभूत ठरू शकते. सुदैवाने व्हिडीओमध्ये कोणतीही दुर्घटना घडत नाही; पण त्यांचा हा स्टंट लोकांना चकीत करून गेला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी त्यावर मजेशीर कमेंटस्‌‍चा पाऊस पाडला आहे. एका यूजरने लिहिलं, ‌‘काकांना शेजारची बातमी कोणत्याही न्यूज चॅनलपेक्षा आधी पाहिजे.‌’ दुसऱ्याने उपरोधिकपणे म्हटलं, ‌‘जीवावर बेतलं तरी चालेल; पण शेजाऱ्यांच्या भांडणाची अपडेट मिस झाली नाही पाहिजे!‌’

logo
Pudhari News
pudhari.news