Malaria Risk Summer | उन्हाळ्यात वाढतोय मलेरियाचा धोका

Malaria Risk Summer
Malaria Risk Summer | उन्हाळ्यात वाढतोय मलेरियाचा धोका
Published on
Updated on

नवी दिल्ली : भारत आणि इतर उष्णकटिबंधीय देशांमध्ये ‘मलेरिया’ ही एक गंभीर आरोग्य समस्या बनली आहे. उन्हाळा वाढताच डासांच्या प्रजननासाठी अनुकूल वातावरण निर्माण होते, ज्यामुळे मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. वेळेवर खबरदारी आणि जागरूकता हाच या आजाराला रोखण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे.

मलेरिया हा ‘प्लास्मोडियम’ जातीच्या परजीवीमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. भारतात प्रामुख्याने प्लास्मोडियम फॅल्सीपेरम आणि प्लास्मोडियम विवॅक्स हे दोन प्रकार सर्वाधिक आढळतात. जेव्हा बाधित ‘मादा अ‍ॅनाफिलीज’ डास माणसाला चावतो, तेव्हा तो रक्तामध्ये मलेरियाचे परजीवी सोडतो. हे परजीवी प्रथम यकृतामध्ये जाऊन आपली संख्या वाढवतात आणि त्यानंतर रक्तातील लाल पेशींवर हल्ला करतात. यामुळे ताप आणि मलेरियाची इतर लक्षणे दिसू लागतात. वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाला तीव्र अ‍ॅनिमिया, अवयव निकामी होणे आणि अत्यंत गंभीर परिस्थितीत मृत्यूचा धोका संभवतो.

डासांच्या पैदासीसाठी उन्हाळा हा सर्वात पोषक ऋतू मानला जातो. वाढते तापमान आणि आर्द्रता यामुळे डासांच्या अळ्यांची वाढ वेगाने होते. एअर कूलर, कुंड्या, बादल्या, छतावरील टाक्या आणि बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे डासांना प्रजननासाठी जागा मिळते. ज्या शहरांमध्ये पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था खराब आहे, तिथे डासांची संख्या झपाट्याने वाढते आणि पर्यायाने संसर्गाचा धोकाही वाढतो.

बचावासाठी काय करावे?

घराभोवती पाणी साचू देऊ नका; साचलेले पाणी त्वरित काढून टाका.

एअर कूलरमधील पाणी नियमित बदला.

डास प्रतिबंधक क्रीम किंवा जाळ्यांचा वापर करा.

अंगाला पूर्ण झाकणारे कपडे परिधान करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news