

टोकियो : जपानी लोक त्यांच्या फिटनेस आणि निरोगी त्वचेसाठी खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्या चमकदार त्वचेपासून ते फिटनेसपर्यंत प्रत्येक गोष्टीचे रहस्य सर्वांना जाणून घ्यायचे असते. जपानी लोकांना चिरतरुण ठेवणारे रहस्य आणखी काहीही नसून ते फक्त तेथील एका प्रकारचे खास जल आहे. हे जल म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आले आणि लिंबू पाणी आहे, जे औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. आल्यामध्ये जिंजरॉल नावाचे सक्रिय संयुग असते, जे पचन सुधारते, स्नायूदुखी कमी करते तसेच रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होण्यास मदत मिळते.
लिंबू हे व्हिटॅमिन सीचा एक उत्कृष्ट स्रोत आहे, जे रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनासाठी तसेच त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त पर्याय आहे. शिवाय ते शरीराला उत्तमरीत्या डिटॉक्सिफाय देखील करते. त्यामुळे हे दोन्ही घटक एकत्र घेतल्याने ते एक शक्तिशाली मिश्रण बनतेे. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते आणि लिंबू पाणी चयापचय वाढवून आणि पचन सुधारून कॅलरीज बर्न करण्यास मदत करू शकते. आल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे भूक कमी लागते. दुसरीकडे, लिंबू भूक कमी करण्याची आणि शरीरातील चरबीचे चयापचय करण्याची क्षमता वाढवते.
लिंबू आणि आले या दोन्हीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे पाचक एंजाईम्सच्या उत्पादनास प्रोत्साहन देतात आणि पचन सुधारतात. हे पाणी दररोज प्यायल्याने सूज कमी होते आणि बद्धकोष्ठता, आम्लपित्त, अपचनासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचा निरोगी, चमकदार बनवण्याचे उत्तम काम करते. या डिटॉक्स वॉटरमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स नैसर्गिक डिटॉक्सिफायर्स म्हणून काम करतात, जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात. पोटाची चरबी कमी करते. जर पोटाच्या चरबीचा त्रास होत असेल तर हे पाणी वरदानापेक्षा कमी नाही. व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेल्या लिंबाचा रस चरबीचे रेणू तोडण्यास मदत करतो. दुसरीकडे, आले चयापचय वाढवण्यास मदत करते.