Lumina Simulation | ‘ल्युमिना’ सिम्युलेशन उलगडणार विश्वाच्या निर्मितीचे गूढ!

Lumina Simulation |
Lumina Simulation | ‘ल्युमिना’ सिम्युलेशन उलगडणार विश्वाच्या निर्मितीचे गूढ!
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन : नासाच्या 'जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप'सारख्या शक्तिशाली दुर्बिणींमुळे आपल्याला विश्वाच्या सुरुवातीच्या काळातील आकाशगंगांची झलक पाहायला मिळते. मात्र, विश्वाच्या बाल्यावस्थेतील अनेक रहस्ये अद्याप उलगडलेली नाहीत. हीच पोकळी भरून काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या पथकाने ‘ल्युमिना’ नावाचे आतापर्यंतचे सर्वात प्रगत आणि भव्य महासंगणकीय सिम्युलेशन विकसित केले आहे. 'मंथली नोटिसेस ऑफ द रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी' या प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

महास्फोटानंतर विश्वात जन्मलेल्या पहिल्या ताऱ्यांनी आणि कृष्णविवरांनी उत्सर्जित केलेल्या अतिनील किरणांमुळे अवकाशातील हायड्रोजन अणूंमधून इलेक्ट्रॉन वेगळे झाले. या प्रक्रियेला 'रिआयनायझेशन' म्हणतात, ज्यामुळे प्रकाशाला लांबवर प्रवास करणे शक्य झाले आणि आकाशगंगांच्या निर्मितीला चालना मिळाली.

हार्वर्ड अँड स्मिथसोनियन सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोफिजिक्सचे मुख्य संशोधक ऑलिव्हर झियर यांनी सांगितले की, 'ल्युमिना'ची व्याप्ती पूर्वीच्या सिम्युलेशनपेक्षा १०० पटीने अधिक आहे. हे मॉडेल सुमारे १.५ अब्ज प्रकाशवर्षे इतक्या प्रचंड अवकाशाचा वेध घेते (आपली आकाशगंगा फक्त १ लाख प्रकाशवर्षे रुंद आहे). अमेरिकेतील ओक रिज नॅशनल लॅबोरेटरीच्या 'फ्रंटियर' या महासंगणकावरील १५,००० हून अधिक ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्सच्या मदतीने हे मॉडेल तयार करण्यास तब्बल तीन वर्षे लागली. या सिम्युलेशनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यात विश्वातील अतिविशाल 'कॉस्मिक वेब'सोबतच (आकाशगंगांचे जाळे) स्वतंत्र आकाशगंगांचे सूक्ष्म तपशीलही स्पष्टपणे पाहता येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.