Lord Jagannath | भगवान जगन्नाथ आजारी; १५ दिवस राहणार ‘क्वारंटाईन’

५६ भोग बंद, वैद्यांकडून उपचार सुरू!
Lord Jagannath |
Lord Jagannath | भगवान जगन्नाथ आजारी; १५ दिवस राहणार ‘क्वारंटाईन’
Published on
Updated on

पुरी : देव कधी आजारी पडू शकतात का? सामान्य माणसाप्रमाणे त्यांनाही तीव्र ताप येऊ शकतो का? आणि सर्वात मुख्य म्हणजे, देवालाही कधी लोकांपासून वेगळे म्हणजेच ‘क्वारंटाईन’ व्हावे लागते का? हे प्रश्न ऐकायला नक्कीच थोडे विचित्र वाटतील; पण या सर्वांचे उत्तर 'हो' असे आहे. सध्या अवघ्या विश्वाचे पालनहार भगवान जगन्नाथ आजारी असून ते एकांतवासात आहेत. गत २९ जूनपासून महाप्रभू जगन्नाथ आजारी असून ते सध्या ‘क्वारंटाईन’ (विलगीकरण) मध्ये आहेत आणि राजवैद्य त्यांच्यावर उपचार करत आहेत. काही वर्षांपूर्वी कोरोना महामारीच्या काळात जगाने ‘क्वारंटाईन’ हा शब्द पहिल्यांदा ऐकला असेल. परंतु भारतामध्ये ही परंपरा शतकानुशतके पाळली जात आहे. स्वतः भगवान जगन्नाथ दरवर्षी पूर्ण १५ दिवसांसाठी ‘क्वारंटाईन’ होतात.

धार्मिक मान्यतांनुसार, भगवान नेहमीच आपल्या भक्तांच्या भावनेच्या अधीन राहतात. जगप्रसिद्ध जगन्नाथ पुरीची रथयात्रा आगामी १६ जुलै रोजी निघणार आहे. पुरीच्या धर्तीवरच मध्य प्रदेशातील दमोहसह देशभरात या प्राचीन परंपरांचे पूर्ण पालन केले जात आहे. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी महाप्रभू जगन्नाथ, त्यांचे मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांना १०८ कलशांच्या पवित्र जलाने भव्य स्नान घातले जाते. या शाही स्नानानंतर महाप्रभूंना तीव्र ताप येतो. यानंतर ते १५ दिवस विश्रांती घेतात, ज्याला ‘अणसर’ किंवा ‘अनावसर’ काळ म्हटले जाते. दुसऱ्या कथेनुसार, ज्येष्ठ महिन्यातील कडक उन्हात जेव्हा भगवान प्रसिद्ध ‘चंदन तलैया’ येथे स्नानासाठी जातात आणि पाण्यातून बाहेर येतात, तेव्हा सामान्य माणसाप्रमाणेच त्यांना उन्हाची झळ लागते. त्यामुळे वैद्य त्यांना विश्रांतीचा सल्ला देतात. त्यांना रोज औषध म्हणून विशेष काढा आणि औषधी वनस्पती दिल्या जातात. भक्त आणि भगवान हे एकमेकांना पूरक मानले जातात.

रथयात्रेच्या १५ दिवस आधी देवाचे आजारी पडणे हे त्यांच्या मानवी रूपातील व्यवहाराचे सर्वात मोठे उदाहरण आहे. देव सध्या अस्वस्थ असल्याने त्यांना त्यांचा आवडता ५६ भोग चढवला जात नाही. त्याऐवजी त्यांना आजारी माणसासारखा साधा आहार आणि दलिया (लापशी) खायला दिला जात आहे. १५ दिवसांच्या क्वारंटाईननंतर आषाढ महिन्याच्या प्रतिपदेला भगवान पूर्णपणे बरे होतात. यानंतर द्वितीया (दूज) तिथीला ते रथारूढ होऊन भक्तांना दर्शन देण्यासाठी नगरभ्रमणावर निघतात. १५ दिवस आजारी राहिल्यामुळे देवाला मंदिरातील एकांत आवडत नाही, म्हणूनच नगरभ्रमणावरून ते थेट मुख्य मंदिरात परतत नाहीत. ते काही दिवस आपल्या मावशीच्या घरी म्हणजेच ‘गुंडिचा मंदिरात’ मुक्कामास जातात. शास्त्रांनुसार, या रथयात्रेचा रथ ओढणे अत्यंत कल्याणकारी मानले जाते आणि यामुळे सर्व पापांचा नाश होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news