विमानावर कोसळली वीज!

विमानावर कोसळली वीज!
File Photo
Published on
Updated on

साओ पावलो : कधी कधी निसर्गाचे थक्क करणारे रूप पाहायला मिळत असते. विजांचा लखलखाट जसा दिपवून टाकतो तसेच अचानक कडकडाट करीत कुठेही कोसळणारी वीज अंगावर शहारेही आणते. वीज कोसळत असतानाचे अनेक फोटो, व्हिडीओ आतापर्यंत प्रसिद्ध झाले आहेत; मात्र ब्राझिलमधील एक ताजा व्हिडीओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. साओ पावलो ग्वारुलहोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभ्या असलेल्या एका विमानावर वीज कोसळली. त्याचा हा व्हिडीओ आहे.

विमानावर वीज कोसळत असतानाची घटना कॅमेर्‍यात रेकॉर्ड झाली आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, विमान विमानतळावर उभे आहे आणि मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यावेळी अचानक विमानाच्या मागील भागावर (शेपटीवर!) ही वीज कोसळली. या घटनेत विमानाचे कोणतेही नुकसान झाले नाही. विमानाची तपासणी करण्यात आली आणि उड्डाणासाठी विमानाला हिरवा कंदीलही दर्शवण्यात आला! या घटनेमुळे विमानाला उड्डाणास थोडा विलंब झाला इतकेच. या विमानाचे उड्डाण सहा तास उशिराने झाले; मात्र या घटनेने विमानतळावर मोठीच खळबळ उडाली होती. हे विमान ब्रिटिश एअरवेजचे होते. या ‘ए 350-1041’ विमानावरील वीज कोळण्याच्या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यावर अनेकांनी अनेक प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. शुक्रवारी साओ पावलोमध्ये मोठा पाऊस झाला होता. त्यामुळे रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news