लिओनार्दो दा विंचीने सर्वप्रथम ओळखली होती चक्रीवादळे?

दा विंची याने १५१४ ते १५१८ या काळात १६ चित्रे काढली
Leonardo Da Vinci first to identify hurricanes?
लिओनार्दो दा विंची यानेच सर्वप्रथम चक्रीवादळे ओळखली.Pudhari File Photo
Published on
Updated on

लंडन : ‘मोनालिसा’सारखी अजरामर कलाकृती बनवणारा इटालियन चित्रकार, शिल्पकार लिओनार्दो दा विंची याच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. हा माणूस एक कलाकार असण्याबरोबरच संशोधकही होता. त्याच्या अनेक चित्रांचा, स्केचेसचा, डायरीतील नोंदींचा आजही अभ्यास होत असतो. लिओनार्दो दा विंची यानेच सर्वप्रथम चक्रीवादळे ओळखली, असे वैज्ञानिकांनी म्हटलेले आहे, हे विशेष!

दा विंची याने कलेतून दाखवले चक्रीवादळ

अ‍ॅन पिझोरूसो या भूगर्भशास्त्रज्ञ व कला विद्वान महिलेने म्हटले होते की, लिओनार्दो दा विंची यांच्या चित्रांमध्ये आपल्याला चक्राकार आवर्तने दिसतात. उपग्रहांचा शोध लागण्याच्या पाचशे वर्षे आधी त्याने चक्रीवादळाचे हे चित्र काढले होते. पिझोरूसो हिने विंडसर कॅसल येथे राजदरबारी असलेल्या पुराच्या चित्रांचा अभ्यास केला होता. ही चित्रे विंचीने काढलेली आहेत. ‘टि्वटिंग दा विंची’ या पुस्तकात तिने हे निष्कर्ष मांडलेले आहेत. दा विंची याने 1514 ते 1518 या काळात 16 चित्रे काढली आहेत. उपग्रह तंत्रज्ञानाचा शोध लागण्याच्या आधी दा विंची याने कलेतून चक्रीवादळ दाखवले आहे. लिओनार्दो हा चक्रीवादळ ओळखणारा पहिला व्यक्ती होता व हवामान वैज्ञानिकांना त्याचा शोध 1970 च्या आसपास लागला होता. एखाद्या काल्पनिक अक्षाभोवती हवेचा प्रवाह फिरतो तेव्हा त्याला ‘व्होरटेक्स फ्लो पॅटर्न’ म्हणतात व पाणीही त्या पद्धतीने गोल फिरू शकते असे पिझोरूसोने म्हटले होते. हे प्रवाह हे चक्रीवादळासारखेच असल्याचे चित्रातून दिसते. दा विंची याच्या आयुष्यात त्याच्या ‘विंची’ या मूळ शहरावरून चक्रीवादळ गेले होते, त्यावेळी अरनो नदीला पूर आला होता. त्यामुळे फ्लोरेन्समध्ये पुराचे पाणी शिरले होते. बेलिनझोना येथे आल्प्सजवळ दरडी कोसळल्या होत्या. ही वादळे कागदोपत्री नोंदलेली आहेत व वादळांमुळे झालेले हिमपात लिओनार्दोच्या नोंदीत सापडतात. त्यात तो म्हणतो की, डोंगर दरीत सात मैल परिसरात हिमपात कोसळून संपला व तेथे तळे तयार झाले. पिझोरूसो हिच्या मते, दाट चक्राकार प्रवाह हे पुराच्या चित्रात जास्त दिसतात याचा अर्थ विंचीने वादळे पाहूनच चित्रे काढली होती. त्यातील काही घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तर काही त्याविरुद्ध दिशेने फिरणारी वादळे आहेत. वातावरणात प्रवाह असेच फिरत असतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news