Lemon comet near Earth | पृथ्वीच्या जवळून जाणार ‘लिंबू’ रंगाचा धूमकेतू ‘लेमन’

केवळ उघड्या डोळ्यांनीच दिसण्याची शक्यता!
lemon colored comet passing near earth
Lemon comet near Earth | पृथ्वीच्या जवळून जाणार ‘लिंबू’ रंगाचा धूमकेतू ‘लेमन’Pudhari File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : ‘लेमन’ नावाचा नुकताच शोध लागलेला एक धूमकेतू या महिन्याच्या अखेरीस पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. काही संशोधकांचा दावा आहे की, हा धूमकेतू उघड्या डोळ्यांनीही दिसू शकतो. मात्र, त्याच्या विशिष्ट लिंबूसारख्या हिरव्या चमकदार रंगामुळे तो कदाचित ‘लेमन’ (लिंबू) नसून दुसर्‍याच लिंबूवर्गीय फळासारखा (citrus fruit) दिसू शकेल! C/2025 A6 (Lemmon) नावाचा हा धूमकेतू अ-आवर्ती (nonperiodic) आहे, याचा अर्थ त्याची कक्षीय वेळ (orbital period) एक सहस्रक वर्षांपेक्षा जास्त आहे आणि तिचे अचूक भाकीत करणे कठीण आहे.

निरीक्षणावरून असे सूचित होते की, हा धूमकेतू सध्या दर 1,350 वर्षांनी सूर्याभोवती फिरतो आणि यातील बहुतेक वेळ तो ऊर्ट क्लाऊड (Oort Cloud) मध्ये घालवतो. हा धूमकेतू आणि बर्फाळ वस्तूंचा एक विशाल समूह असून, तो आपल्या सौरमालेच्या अगदी टोकावर आहे. लेमन धूमकेतू पहिल्यांदा 3 जानेवारी रोजी अ‍ॅरिझोनाच्या सांता कॅटालिना माऊंटन येथील माऊंट लेमन स्कायसेंटर वेधशाळेतील संशोधकांनी पाहिला. त्यावेळी हा धूमकेतू ताशी 130,000 मैल (209,000 कि.मी./तास) वेगाने अंतर्गत सौरमालेकडे झेपावत होता.

इतर महत्त्वाचे धूमकेतू, जसे की SWAN R2 आणि आंतरतारकीय धूमकेतू 3 I/ ATLAS, यांच्यामुळे आतापर्यंत ‘लेमन’ धूमकेतू फारसा चर्चेत नव्हता. 21 ऑक्टोबरला लेमन धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळच्या बिंदूवर पोहोचेल. यावेळी तो आपल्या ग्रहापासून 56 दशलक्ष मैल (90 दशलक्ष किलोमीटर) दूर असेल. हे अंतर चंद्राच्या पृथ्वीपासूनच्या अंतरापेक्षा 230 पट जास्त आहे. 8 नोव्हेंबरला हा धूमकेतू सूर्याच्या सर्वात जवळच्या बिंदूवर पोहोचेल आणि त्यानंतर बाह्य सौरमालेकडे आपला लांब प्रवास सुरू करेल. काही तज्ज्ञांचा अंदाज आहे की, धूमकेतू ‘लेमन’ची द़ृश्यमान तीव्रता 4 पर्यंत पोहोचू शकते. ही इतकी चमक असेल की, तो दुर्बिणशिवाय पाहण्यासाठी पुरेसा तेजस्वी ठरू शकेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news