एआयच्या ‘मायाजाला’त अडकले वकील महाशय!

खून खटल्यात बनावट निकाल, खोटे संदर्भ सादर केल्याने मागितली माफी
lawyer-trapped-in-ai-mirage
एआयच्या ‘मायाजाला’त अडकले वकील महाशय!Pudhari File Photo
Published on
Updated on

मेलबर्न : ऑस्ट्रेलियातील एका खून खटल्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा वापर एका ज्येष्ठ वकिलाला चांगलाच महागात पडला आहे. एआयने तयार केलेले बनावट न्यायालयीन निकाल आणि खोटे संदर्भ सादर केल्याबद्दल त्यांना न्यायालयाची माफी मागावी लागली. या घटनेमुळे जगभरातील न्यायव्यवस्थेत एआयच्या वापरामुळे निर्माण होणार्‍या धोक्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यातील सर्वोच्च न्यायालयात एका अल्पवयीन मुलावर सुरू असलेल्या खून खटल्यात बचाव पक्षाचे ज्येष्ठ वकील ऋषी नथवानी यांनी काही कागदपत्रे सादर केली. मात्र, न्यायाधीश जेम्स इलियट यांच्या लक्षात आले की, कागदपत्रांमध्ये दिलेले न्यायालयीन निवाड्यांचे संदर्भ आणि काही कोटस् अस्तित्वातच नाहीत. चौकशीअंती, ही सर्व माहिती एआयद्वारे तयार करण्यात आल्याचे समोर आले. या गंभीर चुकीमुळे खटल्याच्या निकालास 24 तासांचा विलंब झाला. त्यानंतर वकील नथवानी यांनी आपल्या टीमच्या वतीने न्यायालयाची माफी मागताना जे घडले त्यासाठी आम्ही अत्यंत दिलगीर आणि शर्मिंदा आहोत, असे म्हटले आहे. यावर न्यायाधीश इलियट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, वकिलांनी सादर केलेल्या माहितीच्या अचूकतेवर न्यायालयाचा विश्वास असतो. हे न्यायप्रक्रियेसाठी मूलभूत आहे. एआयचा वापर करण्यापूर्वी त्यातून मिळालेल्या माहितीची स्वतंत्रपणे आणि सखोल पडताळणी करणे बंधनकारक आहे. न्यायालयाने गेल्या वर्षीच एआयच्या वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

जगभरात एआयमुळे गोंधळ

न्यायव्यवस्थेत एआयमुळे गोंधळ होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2023 मध्ये अमेरिकेतही अशाच एका प्रकरणात चॅटजीपीटीने दिलेल्या खोट्या माहितीमुळे दोन वकिलांना 5,000 डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला होता. या ताज्या घटनेमुळे हे स्पष्ट झाले आहे की, एआय हे एक शक्तिशाली साधन असले, तरी त्यावर आंधळा विश्वास ठेवणे किती धोकादायक ठरू शकते, विशेषतः जिथे अचूकतेला सर्वाधिक महत्त्व आहे. या प्रकरणात आरोपीला मानसिक आजारामुळे खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तकरण्यात आले; पण या चुकीने न्यायप्रक्रियेत मोठा व्यत्यय आणला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news