Kilauea volcano eruption | हवाईमधील ‘किलाऊआ’ ज्वालामुखीतून लाव्हाचे फवारे

Kilauea volcano eruption |
Kilauea volcano eruption | हवाईमधील ‘किलाऊआ’ ज्वालामुखीतून लाव्हाचे फवारे
Published on
Updated on

हवाई : निसर्ग जितका सुंदर आहे, तितकाच तो वेळप्रसंगी विनाशकारीही ठरू शकतो, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. अमेरिकेच्या हवाई बेटावरील जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुख्यांपैकी एक असलेल्या ‘किलाऊआ’ ज्वालामुखीने पुन्हा एकदा आग ओकायला सुरुवात केली आहे. मंगळवारी या ज्वालामुखीच्या मुखातून लाव्हाचे विशाल फवारे उडताना दिसले असून, त्यामुळे शास्त्रज्ञ आणि स्थानिक नागरिकांची चिंता वाढली आहे.

नॅशनल वेदर सर्व्हिस आणि हवाई ज्वालामुखी वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, 7 मे (गुरुवार) पर्यंत या ज्वालामुखीचा मोठा स्फोट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्वालामुखीच्या आतून लाल रंगाचा लाव्हा उकळून वर येत असून, प्रशासनाला पूर्णपणे ‘अलर्ट’वर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यूएस भूवैज्ञानिक सर्वेक्षणच्या कॅमेर्‍यांमध्ये ज्वालामुखीच्या अंतर्गत हालचालींचे थरारक व्हिडीओ कैद झाले आहेत. यामध्ये पृथ्वीच्या पोटातील वितळलेले खडक (लावा) बुडबुड्यांच्या स्वरूपात बाहेर येण्याचा प्रयत्न करताना स्पष्ट दिसत आहेत. ही संस्था जगभरातील ज्वालामुखी आणि भूकंपांच्या हालचालींवर 24 तास लक्ष ठेवून असते.

तज्ज्ञांच्या मते, लाव्हा बाहेर पडण्याची ही प्रक्रिया साधारणपणे 12 तासांपेक्षा कमी वेळ चालते. मात्र, मुख्य धोका लाव्हाचा नसून ज्वालामुखीमधून निघणार्‍या राखेचा आहे. वार्‍याच्या दिशेनुसार ही राख हवेत बराच काळ रेंगाळू शकते. किलाऊआ ज्वालामुखीचे सक्रिय होणे ही नवी बाब नाही. आकडेवारीनुसार, डिसेंबर 2024 पासून आतापर्यंत या ज्वालामुखीमध्ये डझनभर वेळा स्फोट झाले आहेत. हे वारंवार होणारे स्फोट हवाई बेटाच्या जमिनीखालील प्रचंड ऊर्जेची जाणीव करून देतात. सुदैवाने, आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीची किंवा वित्तहानीची माहिती समोर आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news