Benefits of laughter | स्वत:वर हसा आणि मानसिक आरोग्य सुधारा

Benefits of laughter |
Benefits of laughter | स्वत:वर हसा आणि मानसिक आरोग्य सुधारा
Published on
Updated on

नवी दिल्ली : हसणे हे आयुष्याचे टॉनिक आहे, असे बरेचदा तुम्ही ऐकले असेल, पण दुसर्‍याने तुमच्यावर हसले तर मात्र तुमचा पारा चढू शकतो. पण स्वत:च स्वत:वर हसला तर...? तर मात्र ते तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. कसे ते पहा...

कल्पना करा, तुम्ही एका भरलेल्या मीटिंगमध्ये तुमच्या खुर्चीवरून घसरलात किंवा एखाद्या नवीन व्यक्तीला चुकीचे काहीतरी बोललात. अशा वेळी आपण अनेकदा लाजेने लाल होतो आणि तो क्षण आठवून तासन्तास अस्वस्थ राहतो, पण जर्नल ऑफ पर्सनॅलिटी अँड सोशल सायकॉलॉजीच्या नवीन संशोधनानुसार, त्या क्षणी जर तुम्ही स्वतःवर हसायला शिकलात, तर ते तुमच्या मानसिक आरोग्यासाठी आणि सामाजिक प्रतिमेसाठी दोन्हीसाठी फायदेशीर आहे. मानसशास्त्रात याला ‘सेल्फ-डेप्रेकेटिंग ह्यूमर’ (स्वतःची चेष्टा करणे) असे म्हणतात. याचा अर्थ आपल्या छोट्या-मोठ्या चुकांना हसण्यावारी नेणे.

तज्ज्ञ म्हणतात की, आपल्या एखाद्या चुकीवर लोक आपल्याला तितके जज करत नाहीत, जितके आपण मनात विचार करतो. एखाद्या चुकीवर मनाला सांगा की, जर यामुळे कोणाला नुकसान झाले नसेल, तर ही काही मोठी गोष्ट नाही. अशा सरावाने स्वतःवरील आत्मविश्वासही वाढेल. स्वतःवर हसणे तोपर्यंतच ठीक आहे जोपर्यंत तुमच्या चुकीमुळे कोणाचे नुकसान होत नाही. जर तुमच्यामुळे कोणाला दुखापत झाली किंवा कोणाचे मन दुखले, तर तिथे हसणे तुम्हाला बेफिकीर दाखवते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news