Late-Night Reels Watching | उशिरापर्यंत रील्स पाहण्याच्या सवयीने बिघडतेय मानसिक स्वास्थ्य

अलार्मसाठी फोनऐवजी वापरा घड्याळ!
Late-Night Reels Watching |
Late-Night Reels Watching | उशिरापर्यंत रील्स पाहण्याच्या सवयीने बिघडतेय मानसिक स्वास्थ्य
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत दिवसभराचे काम आटोपल्यानंतर रात्रीच्या वेळी थोडा मोकळा वेळ मिळतो. बहुतांश लोक झोपण्यापूर्वी स्मार्टफोनचा वापर नक्की करतात. सोशल मीडियावरील घडामोडी पाहण्याच्या नादात काही मिनिटांसाठी हातात घेतलेला फोन कधी तासन्‌तास व्यस्त ठेवतो, हे लक्षातच येत नाही.

सध्या सर्वसामान्यांमध्ये हा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर वाढला असून, वैद्यकीय भाषेत या सवयीला ‘डूमस्क्रॉलिंग’ (Doomscrolling) म्हटले जाते. सोशल मीडिया आणि इंटरनेटवर सातत्याने रील्स, व्हिडीओ किंवा नकारात्मक मजकूर स्क्रॉल करत राहण्याच्या सवयीला ‘डूमस्क्रॉलिंग’ म्हणतात. ही सवय मेंदूला अस्वस्थता, ताणतणाव आणि चिंतेने भरून टाकते. परिणामी, रात्री शांत झोप लागत नाही. जर तुम्हीही रात्री उशिरापर्यंत डोळे उघडे ठेवून स्क्रीन स्क्रॉल करत असाल, तर या सवयीवर मात करण्यासाठी काही सोपे डिजिटल उपाय करता येतील.

रात्री अंथरुणावर पडून सतत फोन वापरणे मानसिक आरोग्यावर थेट आघात करते. यासाठी पुढील सवयी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात : ‘ग्रेस्केल मोड’चा वापर करा : स्मार्टफोनच्या रंगीबेरंगी स्क्रीनकडे सतत पाहत राहिल्याने मेंदू सतत नवीन माहिती मिळवण्यात व्यस्त राहतो. यामुळे डोळ्यांवर प्रचंड ताण येतो आणि झोप उडते. परिणामी, दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो आणि चेहऱ्यावरील टवटवीतपणा कमी होतो. यापासून बचावासाठी झोपण्याच्या किमान एक तास आधी फोनच्या डिस्प्ले सेटिंगमध्ये जाऊन ‘ग्रेस्केल मोड’ (काळा-पांढरा मोड) सुरू करा. स्क्रीनवरील आकर्षक रंग नाहीसे झाल्याने आपोआपच फोन वापरण्याचा मोह कमी होतो आणि फोन बाजूला ठेवणे सोपे जाते.

‘नो-फोन झोन’ ठेवा आणि पारंपरिक अलार्म घड्याळ वापरा : रात्री उशिरापर्यंत फोन वापरून तो उशीजवळ किंवा डोक्याशेजारी ठेवून झोपणे ही लोकांची सर्वात मोठी चूक ठरते. सकाळी उठण्यासाठी फोनमधील अलार्मवर अवलंबून न राहता जुन्या पारंपरिक अलार्म क्लॉकचा वापर करा. स्मार्टफोन नेहमी पलंगापासून ६ ते ७ फूट दूर किंवा दुसऱ्या खोलीत ठेवा. फोन हाताच्या अंतराबाहेर राहिल्यास, मध्यरात्री जाग आल्यावर वारंवार स्क्रीन तपासण्याची सवय सुटेल आणि विनाअडथळा शांत झोप मिळेल. रात्री तासन्‌तास फोन स्क्रॉल करणे ही एक सामान्य सवय वाटू शकते; परंतु उशिरापर्यंत पाहिलेल्या रील्स तुमची शांत झोप आणि मानसिक शांतता दोन्ही हिरावून घेऊ शकतात. उत्तम आरोग्य आणि शांत झोपेसाठी आजपासूनच हे बदल दैनंदिन जीवनात अंगीकारणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञ सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news