Laser Data Transfer | लेझर लाईटच्या मदतीने 1.2 कि.मी. अंतरापर्यंत डेटा ट्रान्स्फर!

चीनने दाखवली 6G नेटवर्कची ताकद
Laser Data Transfer |
Laser Data Transfer | लेझर लाईटच्या मदतीने 1.2 कि.मी. अंतरापर्यंत डेटा ट्रान्स्फर!
Published on
Updated on

बीजिंग : चीनच्या शास्त्रज्ञांनी 6जी (6 G) कम्युनिकेशन तंत्रज्ञानाच्या दिशेने एक मोठे यश संपादन केल्याचा दावा केला आहे. संशोधकांनी एका अशा ‘लेझर-पावर्ड फोटोनिक इंजिन’ चा विकास केला आहे, जे पांढर्‍या प्रकाशाच्या मदतीने लांब अंतरापर्यंत डेटा ट्रान्स्फर करू शकते. शास्त्रज्ञांच्या मते, हे नवीन तंत्रज्ञान भविष्यातील एआय आधारित 6G नेटवर्कला अधिक मजबूत आणि वेगवान बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. हे सिस्टीम एका विशेष प्रकारच्या सिरॅमिक मटेरिअलपासून तयार करण्यात आले असून, याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे सहज शक्य आहे. त्यामुळेच भविष्यात याचा वापर मोठ्या स्तरावर केला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news