

बीजिंग: सोनं... जगातील मौल्यवान धातूंपैकी एक असा धातू, ज्याची सध्याची किंमत अनेकांच्याच आवाक्याबाहेरची आहे. याच सोन्याचा एक प्रचंड मोठा साठा एका देशात सापडला असून, कैक वर्षांपासून हा साठा समुद्राच्या लाटांखाली दडून होता. मात्र आता तो ज्या पद्धतीनं जगासमोर आला आहे, ते पाहता अनेकांच्या भुवया उंचावत आहेत. अतिप्रचंड प्रमाणात सोन्याचा साठा सापडणारा हा देश भारत नव्हे, तर हा भारताचा शेजारी देश चीन.
या देशातील शानडोंग प्रांतातील यांताई शहरात लाईझो किनारपट्टीनजीक समुद्रात हे सुवर्णभांडार हाती लागलं आहे. आतापर्यंत आशिया खंडात सापडलेला हा समुद्राखाली असणारा सर्वात मोठा सोन्याचा साठा आणि एक भारावणारं संशोधन ठरत आहे. यांताईच्या स्थानिक प्रशासनानं हल्लीच एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या उलगड्याची माहिती देत सोन्याचा हा साठा साधारण 3900 टनांहून अधिक असल्याचे सांगितले. चीनच्या एकूण राष्ट्रीय कोषातील 26 टक्के संपत्तीइतका मोठा हा साठा असून, त्यामुळे सोन्याचे भांडार आणि उत्पादनात चीनने पहिला क्रमांक पटकावला आहे.
‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या माहितीनुसार या संशोधनामुळे चीनमध्ये अपेक्षेहून अधिक सोन्याचे साठे असल्याची बाब नाकारता येत नाही. नोव्हेंबर 2025 मध्ये कुनलून पर्वत (शिनजियांग) मध्ये 1000 टन सोन्याचे साठे सापडले होत. तर, काही दिवसांपूर्वी चीनच्या लियाओनिंगमध्ये पहिलं सुपर-लार्ज, लो-ग््रेाड गोल्ड डिपॉजिट सापडलं. ज्यामध्ये 1,444.49 टन सोनं सापडलं असून, 1949 नंतरचं हे मोठं संशोधन ठरलं आहे. सध्याच्या घडीला चीन हा जगातील सर्वात मोठा सोनं उत्पादक देश सषअसून, मागील वर्षी या देशानं 377 टन सोन्याचं उत्पादन केलं होतं.
मात्र प्रमाणित साठ्यांच्या बाबतीत मात्र हा देश अद्यापही दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि रशियापेक्षा मागेच आहे. सध्या जागतिक स्तरावर सोन्याच्या किमती सातत्यानं वाढत आहेत. ज्यामागे चलनातील चढ-उतार, राजकीय तणाव आणि केंद्रीय बँकांची खरेदीक्षमता ही महत्त्वाची कारणं आहेत. सोन्याच्या खाणींमध्ये चीनचं हे संशोधन फक्त आशियाच नव्हे तर, जागतिक सुवर्ण बाजारात मोठी उलथापालथ करणारी ठरणार असून दरांमध्ये आणखी तेजी येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.