जपानमध्ये साबणाच्या पाण्याने धुता येणारा स्मार्टफोन!

जपानी कंपनीने बनवला जगातील पहिला जलावरोधक स्मार्टफोन
Kyocera Digno Rafre
जपानी कंपनीने जगातील पहिला जलावरोधक स्मार्टफोन बनवला आहे.Pudhari File Photo
Published on
Updated on

टोकियो : स्वच्छतेचा द़ृष्टिकोन समोर ठेवून जपानमध्ये एक अनोखा स्मार्टफोनही विकसित केलेला आहे. आपल्याकडे असलेल्या मोबाईल किंवा स्मार्टफोनवर अनेक जीवाणू असतात, पण तो साफ करता येत नाही. स्मार्टफोन पाण्याने धुतला किंवा पाण्यात पडला तर निरूपयोगी होतो. मात्र, एका जपानी कंपनीने जगातील पहिला जलावरोधक स्मार्टफोन बनवलेला असून तो चक्क साबण व पाण्याने धुता येतो.

जपानमध्ये जलावरोधक स्मार्टफोन आधीच बाजारात होते; असे असले तरी जीवाणूपासून मुक्ततेसाठी तो साबणाच्या पाण्याने धुणे शक्य नव्हते, आताचा हा फोन रगडून धुतला तरी त्याला काही होणार नाही अशी उत्पादकांची हमी आहे. मोबाईल स्वच्छतेच्या या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी क्योसेरा या जपानी कंपनीने डिग्नो राफ्रे हा स्मार्टफोन तयार केला आहे, तो साबणाच्या पाण्यात टाकला तरी काही होत नाही. त्यामुळे तो घाण झाला तर धुता येतो. क्योसेरा या जपानी इलेक्ट्रॉनिक्स व सेरॅमिक्स उत्पादकांच्या मते स्वयंपाकघरात, रुग्णालयात व आंघोळ करतानाही हा स्मार्टफोन वापरता येईल, त्याच्या स्पर्श पट्टिका या तो ओला झाला तरी काम करतात. क्योसेराच्या डिग्नो राफ्रे या फोनमध्ये स्मार्ट सॉनिक रिसीव्हर आहे, त्यामुळे ध्वनिवर्धकाशिवाय आवाज ऐकू येतो. राफ्रे हा अँड्राईड फोन असून त्याचा पडदा 5 इंचांचा व 720 पिक्सेलचा आहे. कॅमेरा 13 मेगापिक्सेल असून जाडी 10.1 मि.मी आहे. त्याची बॅटरी तीन हजार अ‍ॅम्पियर तास क्षमतेची असून ती वीस तास चालते. या फोनची किंमत 31 हजार ठेवण्यात आली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news