Footpath driving viral video | फुटपाथवरून स्कुटी नेणार्‍याला केरळच्या आजीने शिकवला धडा!

Footpath driving viral video |
Footpath driving viral video | फुटपाथवरून स्कुटी नेणार्‍याला केरळच्या आजीने शिकवला धडा!
Published on
Updated on

तिरुवनंतपुरम : केरळमधील 73 वर्षांच्या वृद्ध अम्मा प्रभावती सध्या देशभर व्हायरल होत आहेत. त्यांच्या धैर्याला सर्वजण सलाम करत आहेत. एका वृद्ध महिलेने फुटपाथचा वापर रस्त्यासारखा करणार्‍या एका स्कुटीस्वाराला रोखले. त्यांच्या या जिद्दीचा केरळ पोलिसांनी सन्मान केला आहे. बाईकस्वाराला रोखणार्‍या या अम्मांचा पोलिसांनी सत्कार केला आहे.

हे प्रकरण कोझिकोडचे आहे, जिथे ट्रॅफिक नियमांची पायमल्ली करणार्‍या एका स्कुटीस्वाराला वृद्ध महिलेने असा धडा शिकवला की, सोशल मीडियावर त्यांचे प्रचंड कौतुक होत आहे. 73 वर्षीय प्रभावती अम्मा यांनी हे सिद्ध केले आहे की, चुकीच्या कामाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी वय हा अडथळा ठरू शकत नाही. कोझिकोडमध्ये वाहतूक नियम मोडणार्‍या व्यक्तीचा सामना केल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. अम्मांनी ज्या प्रकारे एका जबाबदार नागरिकाप्रमाणे आपला ‘सिव्हिक सेन्स’ दाखवत स्कुटीस्वाराला फुटपाथवरून परत रस्त्याकडे पाठवले, त्यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी त्यांचा सन्मान केला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ आयपीएस अधिकारी सीव्ही आनंद यांनी त्यांच्या एक्स हँडलवर (ऽउतअपरपवखझड) शेअर केला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहा, ज्यावेळी स्कुटीस्वार ट्रॅफिक जामपासून वाचण्यासाठी नियम तोडून फुटपाथवरून जात असतो, त्याचवेळी ही वृद्ध महिला स्कुटीस्वारासमोर भिंतीसारखी उभी राहिली आणि तिने बाजूला हटण्यास नकार दिला. एक हात रेलिंगवर ठेवून व एक पाय आडवा ठेवून अम्माने वाट अडवली. पिशवीतून मोबाईल काढून त्याचे शूटिंगही घेण्यास तिने सुरुवात केली. त्याचवेळी ती नियम सांगून त्याला मुकाट्याने वळून रस्त्यावर परत जा असे ठामपणे सांगतही होती. कुणीतरी तिच्या या धैर्याचा व्हिडीओ वरून टिपला व तो व्हायरल झाला. महिलेच्या या धैर्याचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे. आता हा व्हिडीओ केरळच्या बाहेरही लोकांना ट्रॅफिक नियमांचे पालन करण्याची प्रेरणा देत आहे. ट्रॅफिक नियमांचे पालन करून तुम्ही स्वतःसोबत इतरांचेही प्राण वाचवू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news