Juliet Rose worlds most expensive rose
जगातील सर्वात महाग गुलाब. File Photo

Juliet Rose | तब्बल 130 कोटींचा गुलाब!

जाणून घ्या जगातील सर्वात महाग गुलाब कोणता आहे?

नवी दिल्ली : गुलाबाचे फूल प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. गुलाबाचे फूल अनेक प्रकारांमध्ये आणि रंगांमध्ये उपलब्ध आहे, पण तुम्हाला जगभरातील सर्वात महाग गुलाब माहित आहे का? जगातील सर्वात महाग गुलाबाचं नाव आहे, ज्युलिएट रोज. ज्युलिएट रोज त्याच्या सुगंध, सौंदर्य आणि किमतीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. आता तुम्ही म्हणाल, अशी किती किंमत असेल याची? 10 रुपये, 20 रुपये किंवा मग 100 रुपये... तर थांबा... तुम्ही चुकताय, ज्युलिएट रोजची किंमत अनेक कोटींमध्ये आहे. या गुलाबाच्या किमतीमध्ये तुम्ही मर्सिडीज, ऑडी आणि बीएमडब्ल्यू कार किंवा तीन मोठे बंगले विकत घेऊ शकता. तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्यच नाहीतर अगदी गडगंज श्रीमंत असणारे लोकही हा गुलाब विकत घेताना शंभरदा विचार करतील. या गुलाबाची किंमत आहे 130 कोटी रुपये!

Juliet Rose worlds most expensive rose
जगातील सर्वात महागड्या भाजीत ‘हे’ औषधी गुण!

ज्युलिएट रोज एवढे महाग का आहे?

जगातील सर्वात महागड्या गुलाबांमध्ये समाविष्ट होणारे ज्युलिएट रोज एवढे महाग का आहे? असा प्रश्वन तुम्हाला पडला असेलच. ज्युलिएट रोजची किंमत 130 कोटी रुपये आहे, असे म्हणताच आपल्या भुवया उंचावू शकतात. 2006 मध्ये जगाला पहिल्यांदा ज्युलिएट रोजची ओळख झाली. प्रसिद्ध रोज ब्रीडर डेविड ऑस्टिननं जगासमोर सर्वात आधी ज्युलिएट रोज सादर केलं. या रोज ब्रीडरनं अनेक गुलाबांच्या प्रजाती संकरित करून ज्युलिएट रोज तयार केले होते. त्यावेळी हे गुलाब तब्बल 90 कोटींना विकण्यात आले होते. ज्युलिएट रोजची किंमत ऐकून तुम्हालाही प्रश्न पडेल की, या गुलाबात नक्की आहे काय? एवढे महाग का? हे गुलाब उगवण्यासाठी तब्बल 15 वर्षांचा वेळ लागतो आणि 5 मिलियन डॉलर्स (जवळपास 34 कोटी रुपये) लागतात. डेविड ऑस्टिनच्या वेबसाईटनुसार, ज्युलिएट रोजचा सुगंध चहाच्या गंधाप्रमाणे असतो. त्यामध्ये अनेक छोट्या छोट्या पाकळ्या एखाद्या गुच्छासारख्या असतात.

Juliet Rose worlds most expensive rose
दुर्मीळ निळ्या हिऱ्याचा लिलाव; जगातील सर्वात महागड्या हिऱ्यांपैकी एक ठरला
logo
Pudhari News
pudhari.news