

टोकियो : जपानमधील संशोधकांनी एक असं नवं साधन विकसित केलं आहे, जे प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण न करता संगणकाचा प्रोसेसिंग स्पीड (प्रक्रियेचा वेग) कमालीचा वाढवू शकतं. या शोधामुळे हाय-परफॉर्मन्स कम्प्युटिंगच्या क्षेत्रातील एक मोठी अडचण दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हाय-परफॉर्मन्स कम्प्युटिंगमध्ये, विशेषतः डेटा सेंटर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रोसेसर्ससमोर दोन मोठे अडथळे असतात: १. यासाठी लागणारी महागडी वीज (ऊर्जा). २. प्रक्रिया करताना निर्माण होणारी प्रचंड प्रमाणात नको असलेली उष्णता. सामान्यतः, प्रोसेसर जितक्या वेगाने काम करतो, तितकी जास्त उष्णता तो निर्माण करतो. हा नियम अगदी लहान संगणकापासून ते महाकाय सुपरकंप्युटरपर्यंत सर्वांनाच लागू होतो. जेव्हा संगणक एखादे गुंतागुंतीचे काम करत असतो, तेव्हा त्याला थंड करण्यासाठी आतील पंखे मोठ्याने फिरू लागतात, हा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेल. क्लाउड डेटा सेंटर्समध्ये तर अशी हजारो सर्व्हर्स असतात, ज्यांचे प्रोसेसर्स सातत्याने प्रचंड उष्णता बाहेर टाकत असतात.
शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या या नव्या साधनाला ‘नॉन-व्होलाटाईल स्वीचिंग एलिमेंट’ असं नाव देण्यात आलं आहे. वेगवान प्रक्रियेदरम्यान जी भयानक उष्णता निर्माण होते, ती न होताही हे साधन अत्यंत गतीने डेटा प्रोसेसिंग करू शकतं. हे नवं साधन केवळ ४० पिकोसेकंद (१ सेकंदाचा ४० हजार अब्जावा भाग - 40) एवढ्या अल्प वेळात एक ‘बिट’ (माहितीचा सर्वात लहान घटक, जो ‘१’ किंवा ‘०’ च्या स्वरूपात असतो) प्रोसेस करू शकतं. याउलट, सध्याचे पारंपरिक चिप्स एक बिट प्रोसेस करण्यासाठी किमान एक नॅनोसेकंद (१ सेकंदाचा अब्जावा भाग) किंवा त्याहून अधिक वेळ घेतात. ‘सायन्स’ या प्रसिद्ध नियतकालिकात १४ मे रोजी प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, संशोधकांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे की, पिकोसेकंदच्या श्रेणीत अत्यंत कमी ऊर्जा वापरून ‘स्वीचिंग’ करणे शक्य आहे. संशोधकांनी हे ‘नॉन-व्होलाटाईल स्वीचिंग एलिमेंट’ सिलिकाच्या बेसवर टँटलम आणि 3 चे अत्यंत पातळ थर देऊन तयार केले आहे.
टँटलम : हा एक रिफ्रॅक्टरी मेटल (उच्च तापमान सहन करणारा धातू) आहे, जो वीज साठवून ठेवू शकतो आणि सोडूही शकतो. 3: हा पदार्थ अँटीफेरोमॅग्नेटिक आहे. म्हणजेच याचे चुंबकीय गुणधर्म स्थिर असतात आणि बाहेरील चुंबकीय क्षेत्राच्या हस्तक्षेपाने यामध्ये कोणताही बिघाड होत नाही. या वैशिष्ट्यांमुळे हे उपकरण अत्यंत अचूक आणि वेगवान काम करते.