Japanese Man Becomes Dog | जपानी व्‍यक्‍तीला कुत्रा बनण्‍याचा ध्‍यास!

Japanese Man Becomes Dog |
Japanese Man Becomes Dog | जपानी व्‍यक्‍तीला कुत्रा बनण्‍याचा ध्‍यास!
Published on
Updated on

टोकियो : सोशल मीडियावर सध्या जपानमधील ‘टोको’ नावाच्या व्यक्तीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये टोकोने माणूस सोडून कुत्रा बनण्यासाठी तब्बल २२० कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या व्हायरल दाव्यामागील सत्य पूर्णपणे वेगळे आहे. वास्तविक अहवालानुसार, टोकोने स्वतःसाठी हा खास पोशाख तयार करण्यासाठी सुमारे २० लाख जपानी येन खर्च केले होते, जे भारतीय चलनानुसार सुमारे ११ ते १२ लाख रुपये होतात.

कोणतीही सर्जरी नाही, केवळ ‘हायपर-रिॲलिस्टिक’ ड्रेस

कुत्रा बनण्यासाठी टोकोने आपल्या शरीरावर कोणतीही वैद्यकीय सर्जरी केलेली नाही. त्याने ‘बॉर्डर कॉली’ या कुत्र्याच्या प्रजातीसारखा हुबेहूब दिसणारा एक स्पेशल कॉस्ट्यूम तयार करून घेतला होता. ही कस्टमाइज्ड पोशाख जपानमधील एका विशेष चित्रपट आणि जाहिरात प्रॉडक्शन कंपनीने बनवून दिली आहे. टोकोला लहानपणापासूनच प्राण्यांचे जीवन जगण्याची आवड होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने हा पोशाख परिधान करून रस्त्यावर चार पायांवर चालण्यास सुरुवात केली. टोकोने स्पष्ट केले आहे की, भविष्यात त्याला पांडा आणि अस्वल अशा इतर प्राण्यांचे रूप धारण करून पाहण्याचीही इच्छा आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून, अनेकांनी याला सुरुवातीला एआय निर्मित व्हिडीओ मानले होते. मात्र, ११-१२ लाख रुपयांच्या कॉस्ट्यूमचा हा प्रकार सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news