

टोकियोः जगभरातील अनेक भाकीत करणार्यांमध्ये आपल्या अचूक पूर्वसूचनांमुळे विशेष नाव कमावलेली जपानची माजी मंगा आर्टिस्ट रियो तात्सुकी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांनी यावेळी जुलै 2025 मध्ये भयावह सागरी आपत्ती होणार असल्याचा दावा केला आहे. हे भाकीत प्रलयंकारी सुनामीचे आहे, ज्यात समुद्र जणू उकळतोय, महासागरातून बुडबुडे उसळतायेत आणि संपूर्ण नकाशा बदलवणारा भूकंप होतोय. या महिलेला जपानची ‘बाबा वेंगा’ म्हणतात.
तात्सुकी या साध्याशा स्वभावाच्या कलाकाराने 1980 च्या दशकात आपल्या स्वप्नांची नोंद ठेवायला सुरुवात केली होती. त्यांची स्वप्ने नेहमीच मृत्यू, अग्नी आणि लाटांशी संबंधित असतात. 1999 मध्ये त्यांनी प्रकाशित केलेल्या ‘द फ्युचर आय सॉ’ या मंगा पुस्तकात अनेक भविष्यवाण्या होत्या, ज्या कालांतराने खर्या ठरल्या. त्यांच्या अचूक भाकितांची झलक : 1991: फेडी मर्क्युरी यांचं निधन स्वप्नात पाहिलं. काही महिन्यांनी ते निधन पावले. 1995 : कोबे भूकंप ः स्वप्नात पाहिलेल्या विनाशक काळानंतर, प्रत्यक्षात 17 जानेवारीला 6,000 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू. 2011 : “मार्चमध्ये भयंकर आपत्ती होईल”ः हाच तो महिना जेव्हा तोहोकू भूकंप आणि सुनामी आली आणि 20,000 पेक्षा अधिक मृत्यू झाले. 2025 चा नवीन इशारा: तात्सुकी यांच्या नव्या स्वप्नात त्यांनी जपानच्या दक्षिणेकडील पॅसिफिक महासागरातील पाण्याला उकळताना पाहिले आहे. तेथे त्यांनी ‘हिर्याच्या आकाराचे’ भूकंपीय क्षेत्र पाहिलं. ते जपान, तैवान, इंडोनेशिया आणि नॉर्दर्न मरिआना आयलंड्स दरम्यान पसरलेलं. त्या भागात पृथ्वी इतकी हलली की समुद्रतळाचा नकाशा बदलला! त्यांनी स्वप्नात ‘गडद पाण्यात पोहत असलेले ड्रॅगन’ पाहिले. जरी कोणत्याही अधिकृत संस्थेने अशा आपत्तीची शक्यता जाहीर केली नसेल, तरी पॅसिफिक रिंग ऑफ फायरवर वसलेल्या जपानला नेहमीच धोका असतो. नन्काई ट्रफ क्षेत्रात भूकंप झाल्यास 30 मीटर उंचीची सुनामी येऊ शकते, जी तात्सुकी यांच्या स्वप्नाशी थेट जुळते. तात्सुकी यांनी हवाईजवळील सागरी नकाशांमध्ये ‘ड्रॅगन’सद़ृश भूआकार पाहिल्याचा दावा केला आहे, जो या आपत्तीसोबत जोडलेला असू शकतो. तात्सुकी यांच्या भाकितांनी अनेकांना आश्चर्यचकित केले असले, तरी विज्ञान अजून स्पष्ट उत्तर देत नाही; मात्र जुलै महिना जसजसा जवळ येतोय, तसतशी तिच्या शब्दांनी पुन्हा एकदा संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे.