Robotic Medical Lab : जपानमध्ये सुरू झाली पूर्णपणे ‌‘रोबोटिक‌’ मेडिकल लॅब

दहा रोबो सांभाळत आहेत सर्व जबाबदारी
Robotic Medical Lab
जपानमध्ये सुरू झाली पूर्णपणे ‌‘रोबोटिक‌’ मेडिकल लॅब
Published on
Updated on

टोकियो ः आजच्या काळात रोबोंनी सर्वच क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे. जपानमधील एका विद्यापीठाने नुकतीच एक अशी प्रगत रोबोटिक्स प्रयोगशाळा सुरू केली आहे, जिथे संशोधनासाठी मानवांची गरज उरलेली नाही. या प्रयोगशाळेत सर्व वैद्यकीय प्रयोग केवळ मशिन अर्थात रोबोंद्वारे केले जात आहेत.

टोकियो इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या ‌‘युशिमा‌’ परिसरात ‌‘रोबोटिक्स इनोव्हेशन सेंटर‌’ नावाने ही प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. ‌‘जपान टुडे‌’च्या वृत्तानुसार, या लॅबमध्ये सध्या 10 रोबो काम करत आहेत. विशेष म्हणजे, येथे एकही मानवी कर्मचारी उपस्थित नसून पूर्ण कामकाज रोबोंवर अवलंबून आहे. या प्रयोगशाळेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ‌‘महोलो लॅबड्रॉइड‌’ हा ह्युमनॉइड (मानवासारखा दिसणारा) रोबो. हा रोबो आपल्या दोन हातांच्या साहाय्याने अतिशय नाजूक कामे करतो. यामध्ये पुढील कामांचा समावेश आहे: अभिकर्मकांचे (ठशरसशपीीं) अचूक प्रमाण हस्तांतरित करणे. तापमान नियंत्रित करणाऱ्या उपकरणांवर देखरेख ठेवणे. सेल कल्टिव्हेशन (पेशी संवर्धन) प्रक्रिया स्वयंचलितपणे पूर्ण करणे. विद्यापीठाचे ध्येय केवळ 10 रोबोंपुरते मर्यादित नाही. 2040 पर्यंत या केंद्रात रोबोंची संख्या वाढवून 2,000 करण्याचा त्यांचा मानस आहे. संपूर्ण वैद्यकीय संशोधन प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित करणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.

वैद्यकीय क्षेत्रात ही मोठी क्रांती घडवण्यामागे दोन मुख्य कारणे आहेत: 1. कर्मचाऱ्यांची कमतरता : जपानमध्ये सध्या कुशल कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता भासत आहे. 2. अचूकता : प्रयोगशाळेतील कामांमध्ये मानवी चुका होण्याची शक्यता असते, ज्या रोबोंमुळे टाळता येतात. ‌‘महोलो‌’ या रोबोचा वापर यापूर्वी कोबे येथील एका डोळ्यांच्या रुग्णालयातही यशस्वीपणे करण्यात आला आहे. आता या नवीन केंद्रात अनेक संशोधक देखील रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news