Japan AI Cooling Technology | जपानमध्ये एआय व पावसाच्या साहाय्याने घरे थंड ठेवण्याचा नवा उपाय

Japan AI Cooling Technology |
Japan AI Cooling Technology | जपानमध्ये एआय व पावसाच्या साहाय्याने घरे थंड ठेवण्याचा नवा उपाय
Published on
Updated on

टोकियो : उन्हाळ्यात तीव्र उष्णतेमुळे शहरांमध्ये वातानुकूलित यंत्रणांचा (एसी) वापर आणि विजेची खपत प्रचंड वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत, पावसाळ्यात छतांवर साचणारे पाणीच उष्णतेविरुद्ध लढण्याचे मुख्य शस्त्र बनले तर? टोकियो शहरावर आधारित एका नव्या संशोधनात याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यात आले आहे. शास्त्रज्ञांनी ‘रूफटॉप रेनवॉटर हार्वेस्टिंग’, ‘रूफ स्प्रिंकलिंग’ आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) यांची सांगड घालून शहरातील तापणाऱ्या इमारतींना अधिक प्रभावीपणे कसे थंड करता येईल, याचा अभ्यास केला आहे.

या तंत्रज्ञानाची संकल्पना अतिशय सोपी आणि व्यावहारिक आहे. पाण्याची साठवणूक : पावसाळ्यात इमारतींच्या छतांवर येणारे पाणी टँकमध्ये साठवले जाईल. स्प्रिंकल सिस्टीम : जेव्हा उन्हाळ्यात प्रचंड उष्णता वाढेल, तेव्हा हेच साठवलेले पाणी छतावर फवारले जाईल. बाष्पीभवन : पाण्याचे थेंब छताच्या गरम पृष्ठभागावर पडताच त्यांचे बाष्पीभवन होईल आणि ते छतातील उष्णता शोषून घेतील. तापमानात घट : यामुळे छताचे तापमान कमी होऊन इमारतीच्या आत पोहोचणारी उष्णता रोखली जाईल. म्हणजेच, जे पावसाचे पाणी सामान्यतः ड्रेनेजमध्ये वाहून जाते, तेच पाणी उष्णतेविरुद्ध ‘कूलिंग रिसोर्स’ म्हणून काम करेल.

या सिस्टीमचा सर्वात मोठा फायदा म्हणजे केवळ छत थंड ठेवणे एवढाच नाही, तर इमारतीचे तापमान नियंत्रित राहिल्यामुळे आत खोल्या थंड ठेवण्यासाठी एसीला जास्त मेहनत करावी लागणार नाही. यामुळे ‘ॲअर कंडिशनिंग’ची विजेची खपत कमी होण्याची मोठी शक्यता निर्माण होते. या सिस्टीमचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे ‘रेनवॉटर मॅनेजमेंट’. शहरांमध्ये मुसळधार पावसात पाण्याचा मोठा प्रवाह रस्ते आणि ड्रेनेजवर ताण आणतो. पावसाच्या पाण्याचा काही भाग छतावरील टँकमध्ये साठवल्यास रस्त्यांवर वाहून जाणारे पाणी कमी होईल. म्हणजेच, ही एकच यंत्रणा रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि हीट ॲडॉप्टेशन (उष्णतेवर मात करणे) अशा दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य करू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news