Ancient Galaxy discovery | जेम्स वेब टेलिस्कोपने शोधली अतिप्राचीन आकाशगंगा

Ancient Galaxy discovery |
Ancient Galaxy discovery | जेम्स वेब टेलिस्कोपने शोधली अतिप्राचीन आकाशगंगाFile Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : नासाच्या ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’ने अवकाशातील आतापर्यंतची सर्वात दूरवरची आकाशगंगा शोधून पुन्हा एकदा नवा इतिहास रचला आहे. ‘MoM- z14’ असे नाव देण्यात आलेली ही आकाशगंगा ब्रह्मांडाच्या उत्पत्तीनंतर म्हणजेच ‘बिग बँग’नंतर अवघ्या 28 कोटी वर्षांनी अस्तित्वात आली होती. यापूर्वी विश्वातील सर्वात दूरवरची आकाशगंगा म्हणून ‘JADES- GS- z14-0’ ची नोंद होती. मात्र, नव्या संशोधनानुसार MoM- z14 ने हा विक्रम मागे टाकला आहे. शास्त्रज्ञांनी ‘रेडशिफ्ट’ (Redshift) तंत्रज्ञानाचा वापर करून याचे अंतर मोजले असून, MoM- z14 चा रेडशिफ्ट 14.44 इतका नोंदवण्यात आला आहे, जो आधीच्या विक्रमापेक्षा (14.18) अधिक आहे.

याचाच अर्थ असा की, या आकाशगंगेने उत्सर्जित केलेला प्रकाश अब्जावधी वर्षांचा प्रवास करून आता कुठे म्हणजे तब्बल 28 कोटी वर्षांनंतर जेम्स वेबच्या इन्फ्रारेड सेन्सर्सपर्यंत पोहोचला आहे. एमआयटीच्या कावली इन्स्टिट्यूटमधील प्रमुख संशोधक रोहन नायडू यांनी सांगितले की : ‘वेब टेलिस्कोपमुळे आपण मानवी इतिहासात कधीही पाहिले नव्हते इतक्या दूरवर पाहू शकत आहोत. विशेष म्हणजे, सुरुवातीचे विश्व कसे असेल याबाबत आमचे जे अंदाज होते, त्यापेक्षा हे चित्र खूप वेगळे, आव्हानात्मक आणि तितकेच रोमांचक आहे.’

2022 पासून कार्यरत असलेल्या जेम्स वेब टेलिस्कोपने अपेक्षेपेक्षा जास्त तेजस्वी आणि प्राचीन दीर्घिका आकाशगंगा आहेत. यामुळे ब्रह्मांडाच्या सुरुवातीच्या काळातील आकाशगंगांच्या निर्मितीबाबतच्या प्रचलित सिद्धांतांना मोठे आव्हान मिळाले आहे. ‘बिग बँग’नंतरच्या पहिल्या 50 कोटी वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणात आकाशगंगा कशा तयार झाल्या, यावर आता खगोलशास्त्रज्ञ नव्याने विचार करत आहेत. ब्रह्मांडाचा विस्तार होत असताना लांबच्या वस्तूंतून निघणारा प्रकाश ताणला जातो, ज्यामुळे त्याची तरंगलांबी अधिक ‘लाल’ होते. यालाच ’रेडशिफ्ट’ म्हणतात. प्रकाश जितका जास्त प्रवास करतो, तितका हा रेडशिफ्ट मोठा असतो. एप्रिल 2025 मध्ये केलेल्या निरीक्षणातून या नव्या आकाशगंगेच्या वयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news