

वॉशिंग्टन डीसी : वैज्ञानिकांनी मंगळ ग्रहाच्या खाली एक विशाल रहस्यमय रचना शोधली आहे. ही रचना लाल ग्रहाच्या आत एका मोठ्या ज्वालामुखी असलेल्या भागात दडलेली आहे. हे अनेक किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे. मंगळ ग्रहावरील थार्सिस मॉन्टेसच्या खाली लपलेल्या या रचनेने वैज्ञानिकांना आश्चर्यचकित केले आहे. हा भाग नेहमीच संशोधकांना आकर्षित करतो, कारण येथे सौर मंडळातील सर्वात मोठा ज्वालामुखी ऑलिम्पस मॉन्स आहे.
थार्सिस मॉन्टेसमध्ये पॅव्होनिस मॉन्स, एस्क्रेअस मॉन्स आणि अर्सिया मॉन्स हे तीन अन्य ज्वालामुखी देखील आहेत, तथापि मंगळ ग्रहावर आता कोणताही सक्रिय ज्वालामुखी नाही. रिसर्च पेपरमध्ये असे म्हटले आहे की, ही रचना सुमारे 1,750 किलोमीटर रुंद आणि 1,100 किलोमीटर खोल आहे. त्याचे वजन खूपच कमी आहे. असे मानले जाते की हे मंगळाच्या आवरणातून वर येत आहे. संशोधकांचा असा विश्वास आहे की, हा शोध या शक्यतेकडे इशारा करतो की लाल ग्रहाच्या आत आजही काही भूगर्भीय हालचाली होत आहेत, ज्यामुळे पृष्ठभागावर नवीन ज्वालामुखी रचना निर्माण होतात.
याबाबतचा शोधनिबंध ‘जर्नल जेजीआर: प्लॅनेटस् लास्ट इयर’मध्ये प्रकाशित झाला आहे, ज्याचे नेतृत्व डेल्फ्ट टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे डॉक्टर बार्ट रूट करत आहेत. थार्सिस मॉन्टेस ज्वालामुखी काही कोटी वर्षे जुना मानला जातो. वैज्ञानिकांनी या भागात मोठ्या प्रमाणात ज्वालामुखी असल्यामुळे येथे रुची दर्शवली होती, जरी आता यातला एकही सक्रिय नाही, तरीही संशोधकांचे म्हणणे आहे की, ज्वालामुखीच्या आत आढळणारी ही संरचना दर्शवते की भविष्यात ज्वालामुखी सक्रिय होण्याची शक्यता आहे.
संशोधकांनी सांगितले की, ही संरचना थार्सिस मॉन्टेसच्या खाली वाढणारा एक मेंटल प्ल्यूम आहे. रिसर्च पेपरमध्ये लेखकांनी सांगितले की, प्ल्यूमचे शिर भविष्यात ज्वालामुखीला एक्टिव्ह करण्यासाठी लिथोस्फियरच्या दिशेने वाहत आहे. जर हे पृष्ठभागावर पोहोचले, तर यामुळे अनेक ज्वालामुखी फुटू शकतात. वैज्ञानिकांनी म्हटले आहे की हे शक्य आहे. कारण थार्सिस मॉन्टेस रेड प्लॅनेटच्या बाकीच्या पृष्ठभागापेक्षा अधिक उंचीवर आहे, म्हणजेच हे त्याला वरच्या दिशेने ढकलत आहे.