Life on the moon without sun |
Life on the moon without sun | सूर्याशिवाय चंद्रावर जीवन शक्य आहे का?

Life on the moon without sun | सूर्याशिवाय चंद्रावर जीवन शक्य आहे का?

शास्त्रज्ञांनी शोधला जीवसृष्टीचा दुसरा मार्ग!
Published on

म्युनिक : आपण मानतो की जीवनासाठी सूर्याचा प्रकाश आणि उष्णता अनिवार्य आहे. परंतु, ल्युडविग मॅक्सिमिलियन युनिव्हर्सिटीमधील (एलएमयू) शास्त्रज्ञांनी एका नवीन संशोधनाद्वारे हा समज मोडीत काढला आहे. अंतराळात मुक्तपणे फिरणार्‍या रॉग प्लॅनटस् आणि त्यांच्या चंद्रावर सूर्याशिवायही जीवसृष्टी बहरण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

सूर्याशिवाय उष्णता कशी मिळते?

ज्याप्रमाणे आपल्या समुद्रात भरती-ओहोटी येते, तसेच रॉग प्लॅनेटस्च्या गुरुत्वाकर्षणामुळे त्यांच्या चंद्राच्या अंतर्गत भागात घर्षण होते. या घर्षणामुळे प्रचंड उष्णता निर्माण होते, जी चंद्राच्या पृष्ठभागाखाली किंवा पृष्ठभागावर पाणी द्रव स्वरूपात ठेवण्यास पुरेशी असते. शास्त्रज्ञांच्या मते, जर या चंद्रावर हायड्रोजनचे दाट वातावरण असेल, तर ते एका उबदार ब्लँकेटसारखे काम करते. कोलिजन-इंड्युस्ड अ‍ॅब्सॉर्प्शन (सीआयए) नावाच्या प्रक्रियेद्वारे हायड्रोजनचे रेणू उष्णता बाहेर जाण्यापासून रोखतात.

सिम्युलेशननुसार, जर वातावरण पृथ्वीपेक्षा 100 पटीने दाट असेल, तर हे चंद्र चक्क 4.3 अब्ज वर्षे (म्हणजे पृथ्वीच्या वयाइतकी) पाणी द्रव स्थितीत ठेवू शकतात. जीवसृष्टीसाठी महत्त्वाचे असलेले आरएनए रेणू तयार होण्यासाठी ओले आणि सुके चक्र आवश्यक असते. या रॉग मून्सवर ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणामुळे येणार्‍या महाकाय लाटा अशा प्रकारचे चक्र निर्माण करू शकतात. त्यामुळे जीवनाचा उगम होणे शक्य आहे. थोडक्यात रॉग प्लॅनेटस् कोणत्याही तार्‍याभोवती फिरत नाहीत, तर अंतराळात मुक्त संचार करतात. आपल्या आकाशगंगेत तार्‍यांच्या संख्येइतकेच रॉग प्लॅनेटस् असण्याची शक्यता आहे. सध्या हे सर्व सिद्धांतांवर आधारित आहे, कारण आपण अद्याप असा रॉग एक्सोमून प्रत्यक्ष पाहिलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news