पृथ्वीवर माणूसच आहे ‘एलियन’?

पृथ्वीवर माणूसच आहे ‘एलियन’?
File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : ‘एलियन’ म्हणजेच परग्रहवासीयांचे अस्तित्व आहे की नाही, याबाबत अजूनही संशोधन सुरूच आहे. मात्र, खुद्द माणूसच पृथ्वीवर अन्य खगोलांवरून येऊन विकसित झाला असावा, याचे संकेत मिळाले आहेत. जागतिक स्तरावर विविध देशांच्या विविध अंतराळ संशोधन संस्था अनेकविध मार्गांनी अवकाश आणि त्याच्याशी संबंधित कैक संकल्पनांचा उलगडा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळालं आहे. नासा असो किंवा इस्रो, प्रत्येक संस्थेनं या क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान दिलेलं असतानाच, आता विज्ञानालाच हैराण करणार्‍या एका संशोधनानं सर्वांनाच हैराण केलं आहे.

24 डिसेंबर 2023 रोजी बेन्नू लघुग्रहावरून परतलेल्या नासाच्या ओसाइरिस रेक्स यानाच्या नमुन्यांमधून अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर आली असून, या लघुग्रहामधील नमुन्यांत मानवी अस्तित्वाशी संबंधित घटक असल्याचं आढळून आलं आहे. इतकंच नव्हे, तर या लघुग्रहावरील नमुन्यांमध्ये बर्‍याच प्रमाणात कार्बन आणि पाण्याचाही अंश आढळला आहे.

निरीक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार ‘डीएनए’ आणि ‘आरएनए’ च्या पाच न्यूक्लिओबेसेस आणि प्रोटिनमध्ये आढळणार्‍या 20 अमिनो अ‍ॅसिडपैकी 14 नमुने असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामुळं पृथ्वीवर असणारी मानवप्रजाती एलियनच आहे का? हा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. इतकंच नव्हे, तर मानवी अस्तित्वाची उत्पत्ती एखाद्या लघुग्रहापासून झाली आहे का? हा प्रश्नही इथं उपस्थित केला जात आहे. नासाच्या यानानं 1650 फूट रुंद असणार्‍या या लघुग्रहावरील खडक-मातीचा नमुना पृथ्वीवर पाठवला. ज्याच्या परीक्षणानंतर पहिला अहवाल जारी करण्यात आला आहे. नेचर अ‍ॅस्ट्रोनॉमीनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार नासामध्ये अ‍ॅस्ट्रोबायोलॉजिस्टपदी असणार्‍या डॅनिअल जेल्विन यांनी अहवालातून समोर आलेली माहिती हैराण करणारी असल्याचं सांगितलं. जीवसृष्टीच्या अगदीच प्रारंभिक तत्त्वांचा उलगडा या नमुन्यातून होत असून, या संपूर्ण उल्कापिंडावर न जाणो किती मोठ्या संख्येने जीवसृष्टीची बीजे अस्तित्वात असतील, यासंदर्भात संशोधकांनीही आश्चर्याची भावना व्यक्त केली. संशोधकांनी आणखी सविस्तररीत्या दिलेल्या माहितीनुसार 159 वर्षांनंतर म्हणजेच 24 सप्टेंबर 2182 मध्ये हाच लघुग्रह पृथ्वीवर आदळू शकतो. या क्रियेमुळे 22 अणुबॉम्बच्या स्फोटाइतका मोठा स्फोट होऊन विध्वंस होऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news