

वॉशिंग्टन/तेहरान : मध्य पूर्वेतील शक्तिशाली देश इराण सध्या युद्धाच्या ज्वाळांमध्ये होरपळत आहे. अमेरिकेसमोर झुकण्याऐवजी संघर्षाचा मार्ग निवडल्याने आणि इस्रायली हल्ल्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर हे युद्ध अधिकच भीषण झाले आहे. मात्र, एकीकडे दोन्ही देशांत टोकाचा संघर्ष सुरू असताना, एका इराणी वंशाच्या व्यक्तीने चक्क अमेरिकेत बसूनच अब्जावधी डॉलर्सचे सामाज्य उभे केले आहे. हे सामाज्य चक्क जुन्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीतून बनवलेले आहे हे विशेष! आपण बोलतोय इराणचे सर्वात श्रीमंत उद्योगपती पिएर ओमिद्यार यांच्याबद्दल. इराणकडे तेल आणि नैसर्गिक वायूची मोठी ताकद आहेच; पण ओमिद्यार यांनी आपल्या ‘व्यापारी बुद्धी’च्या जोरावर कोणतीही वस्तू स्वतः न बनवता केवळ खरेदी-विक्रीच्या माध्यमातून 11.4 अब्ज डॉलर्सची संपत्ती निर्माण केली आहे.
आज जे काम फ्लिपकार्ट किंवा मीशो सारख्या कंपन्या करत आहेत, ते ओमिद्यार यांनी 1995 मध्येच करून दाखवले होते. अवघ्या 28 व्या वर्षी त्यांनी जगातील पहिले ऑनलाईन रिटेल मार्केटप्लेस ‘शइरू’ सुरू केले. ओमिद्यार यांचा जन्म 21 जून 1967 रोजी पॅरिसमध्ये झाला. त्यांचे इराणी आई-वडील उत्तम शिक्षणासाठी फ्रान्समध्ये आणि नंतर अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांनी एक असा प्लॅटफॉर्म तयार केला जिथे खरेदीदार आणि विक्रेते एकत्र येऊ शकले. जुन्या वस्तूंच्या लिलावातून या कंपनीने अल्पावधीतच अफाट नफा कमावला. 2002 मध्ये शइरू ने ऑनलाईन पेमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘झरूझरश्र’ विकत घेतली. ओमिद्यार यांच्याकडे ‘ढहश खपींशीलशीिं’ आणि ‘ढेळिल र्डीींवळेी’सारख्या मोठ्या मीडिया कंपन्यांची मालकी आहे. ‘फोर्ब्स’च्या श्रीमंतांच्या यादीनुसार, ओमिद्यार यांची वैयक्तिक संपत्ती 11.3 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे, तर शइरू ची मार्केट व्हॅल्यू सध्या 40.71 अब्ज डॉलर्स इतकी आहे. ज्या इराणवर अमेरिका निर्बंध घालत आहे आणि हल्ले करत आहे, त्याच अमेरिकेच्या भूमीवर राहून एका इराणी व्यक्तीने जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक उभी केली, हा एक मोठा विरोधाभास मानला जात आहे. ओमिद्यार हे 2020 मध्ये शइरू च्या बोर्डावरून बाजूला झाले असले, तरी कॅलिफोर्निया आणि मेक्सिकोमध्ये त्यांचे अनेक आलिशान रिसॉर्टस् आणि व्यवसाय आजही विस्तारत आहेत.