3D lung model | भारतीय वैज्ञानिकांनी बनवले फुफ्फुसांचे थ्रीडी मॉडेल

3D lung model
3D lung model | भारतीय वैज्ञानिकांनी बनवले फुफ्फुसांचे थ्रीडी मॉडेल
Published on
Updated on

बंगळूर : भारतासारख्या विकसनशील देशात टीबी (क्षयरोग) हा आजही एक गंभीर आरोग्य प्रश्न आहे. दरवर्षी लाखो लोक या आजाराने बाधित होतात. मात्र, आता या आजाराच्या उपचारात एक क्रांतिकारी बदल घडवणारी बातमी समोर आली आहे. बंगळूर येथील भारतीय विज्ञान संस्थेच्या (IISc) संशोधकांनी प्रयोगशाळेत चक्क फुफ्फुसांचे थ्रीडी मॉडेल तयार केले आहे, ज्यामुळे टीबीच्या औषधांचे परीक्षण आता अधिक अचूक आणि जलद गतीने करणे शक्य होणार आहे.

आतापर्यंत प्रयोगशाळेत टीबीच्या औषधांची चाचणी प्लास्टिकच्या सपाट प्लेटस्वर (2 D मॉडेल) केली जात असे. परंतु, मानवी फुफ्फुसे सपाट नसून ती त्रिमितीय (3 D) असतात. संशोधकांनी कोलेजन जेलच्या मदतीने अशी एक 3डी रचना तयार केली आहे, जी हुबेहूब मानवी फुफ्फुसांच्या उतींप्रमाणे कार्य करते. या मॉडेलमध्ये टीबीचे जीवाणू अगदी तसेच वाढतात जसे ते एखाद्या रुग्णाच्या शरीरात वाढतात. IISc चे डॉ. रचित अग्रवाल आणि त्यांच्या टीमने केलेल्या या संशोधनानुसार, जुन्या 2डी मॉडेल्समुळे अनेकदा औषधांच्या परिणामांची अचूक माहिती मिळत नसे.

टीबीवरील महत्त्वाचे औषध ‘पायराजीनामाइड’ जुन्या मॉडेल्समध्ये निष्प्रभ वाटायचे. मात्र, या नवीन 3डी मॉडेलमध्ये त्या औषधाने अगदी रुग्णाच्या शरीरात दाखवतो तसाच सकारात्मक परिणाम दाखवला आहे. याचाच अर्थ असा की, आता कोणतीही नवीन औषधे बाजारात आणण्यापूर्वी त्यांची विश्वासार्हता अधिक चांगल्या प्रकारे तपासता येईल. टीबी म्हणजेच क्षयरोग हा एक संसर्गजन्य आजार असून तो ‘मायकोबॅक्टेरियम ट्यूबरकुलोसिस’ नावाच्या जीवाणूमुळे होतो. हा आजार प्रामुख्याने फुफ्फुसांवर हल्ला करतो आणि हवेद्वारे एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे पसरतो. फुफ्फुसांव्यतिरिक्त हा जीवाणू मणका, मेंदू आणि मूत्रपिंडावरही परिणाम करू शकतो. भारतीय वैज्ञानिकांच्या या यशामुळे भविष्यात टीबीमुक्त भारताचे स्वप्न पूर्ण होण्यास मोठी मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news