भारतीय माणसाने 168 कोटींत विकले डोमेन नेम

अवघ्या चार अक्षरांचे नाव या भारतीय व्यक्तीने ओपन एआय कंपनीला विकले
Indian man sells one of the oldest domain name to OpenAI for Rs 168 Crore
अवघ्या चार अक्षरांचे नाव भारतीय व्यक्तीने ओपन एआय कंपनीला विकले. Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन : शेक्सपिअरने आपल्या एका नाटकात ‘नावात काय आहे?’ असा सवाल केला होता; मात्र त्यामुळे जगभरातील नाममहात्म्य काही कमी झाले नाही. आता तर हाय टेक युगात ‘डोमेन नेम’ नावाच्या नावाला भलतीच किंमत आली आहे. जगभरात साधारण मागील दीड ते दोन वर्षांपासून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे चॅट जीपीटी! अमेरिकेतील ओपन एआय नावाच्या कंपनीने तयार केलेले चॅट जीपीटी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत असून यासाठी कारणीभूत ठरला आहे एक भारतीय व्यक्ती. खरे तर या कंपनीमुळे हा भारतीय व्यक्ती रातोरात दीडशे कोटींहून अधिक संपत्तीचा मालक झाला आहे. अवघ्या चार अक्षरांचे नाव या भारतीय व्यक्तीने ओपन एआय कंपनीला विकले असून त्याच्या मोबदल्यात या व्यक्तीला ओपन एआयने तब्बल 168 कोटी रुपये दिले आहेत.

जी व्यक्ती 168 कोटींची मालक झाली आहे तिचं नाव आहे, धर्मेश शाह! आता या व्यक्तीने ओपन एआय कंपनीला काय विकलं? तर त्यांनी रजिस्टर करून ठेवलेलं डोमेन नेम. वेबसाईटच्या नावावर असलेला मालकी हक्क या व्यक्तीने ओपन एआय कंपनीला विकला. आता असं कोणतं नाव या व्यक्तीने 168 कोटींना विकलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ते नाव आहे, ‘चॅट डॉट कॉम’. धर्मेश शाह हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील फार जुनं नाव असून त्यांनी स्वत:च्या नावावर रजिस्टर केलेलं ‘चॅट डॉट कॉम’ हे डोमेन नेम जगातील सर्वात जुन्या आणि आजही सक्रिय असलेल्या डोमेन नेमपैकी एक आहे. हे डोमेन नेम विकत घेतल्यानंतर ही वेबसाईट चॅटजीपीटीच्या वेबसाईटवर रियाडरेक्ट करण्यात आली आहे. म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास आता ‘चॅट डॉट कॉम’ असं इंग्रजीत सर्च केलं तर थेट चॅट जीपीटीची वेबसाईट ओपन होते. धर्मेश शाह यांनी ‘चॅट डॉट कॉम’ हे डोमेन नेम मागच्या वर्षीच विकत घेतलं होतं. 1996 साली रजिस्टर झालेलं हे डोमेन नेम आपल्या नावावर करून घेण्यासाठी धर्मेश यांनी 130 कोटी रुपये मोजले होते. म्हणजेच वर्षभरात या डोमेन नेमची खरेदी करून विक्री केल्याने धर्मेश यांना 34 कोटींचा फायदा झाला आहे. ओपन एआयचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष सॅम अल्टमन यांनी सोशल मीडियावरून केवळ ‘चॅट डॉट कॉम’ असं पोस्ट करत हे डोमेन नेम विकत घेतल्याचं जाहीर केलं होतं. हे डोमेन नेम धर्मेश शाह यांच्याकडून घेताना झालेल्या डीलमध्ये ओपन एआय कंपनीचे काही शेअर्सही त्यांना देण्यात आले आहेत; मात्र हे शेअर्स नेमके किती आहेत याचा खुलासा कोणत्याच पक्षाने केलेला नाही.

Indian man sells one of the oldest domain name to OpenAI for Rs 168 Crore
एआय रोबोटिक सर्जरीमुळे शक्य होणार मेंदूचे प्रत्यारोपण!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news