भारतीय जोडप्याने मुलाचे नाव ठेवले ‘कांग तै मू’ त्रिपाठी! कोरियन वेब सीरिजमधून घेतली प्रेरणा

सोशल मीडियावर चर्चेला उधाण
indian couple korean drama inspired baby name kang tae moo
कोरियन नाटकापासून प्रेरित होऊन भारतीय जोडप्याने मुलाचे नाव कांग तै मू ठेवले.Pudhari File Photo
Published on
Updated on

सेऊल : एखाद्या भारतीय दांपत्याने आपल्या बाळाचे नाव ‘कांग तै मू’ असे ठेवले तर अनेकांना आश्चर्य वाटेल. हा आहे ओटीटीवर वेबसीरिज आणि चित्रपट पाहत बसण्याचा परिणाम! अलीकडे वेबसीरिज आणि चित्रपट ओटीटीवर पाहण्याचे तरुणाईला वेड लागले आहे. काहीजण तर कोरियन ड्रामा सीरिज मोठ्या प्रमाणात पाहतात. भारतात कोरियन ड्रामाने तर तरुणाईला भुरळच घातली आहे. एका ओटीटी प्लॅटफॉर्मच्या ग्राहकांपैकी 10 पैकी 6 लोक कोरियन सीरिज पाहतात. अशा कोरियन सीरिजला भुलूनच एका भारतीय तरुणाने त्याच्या मुलाचे नाव कोरियन भाषेत ठेवलं आहे. मात्र, सोशल मीडियावर यावरून चर्चेला उधाण आलं आहे.

कोरियन सीरिजचे चाहते त्या सीरिज आणि चित्रपटातील कलाकारांच्या इतक्या प्रेमात असतात की, ते त्यांच्यासारखा दिसण्याचा प्रयत्नदेखील करतात. अशा प्रभावातूनच या भारतीय जोडप्याने त्यांच्या मुलाचे नाव कोरियन भाषेत ठेवले आहे. या जोडप्याच्या एका नातेवाईकाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट आता चांगलीच व्हायरल होत आहे. दिव्या नावाच्या एका महिलेने एक्स (ट्विटर)वर हे शेअर केले आहे. या पोस्टमध्ये महिलेने म्हटलं आहे की, तिच्या भावाला आणि त्याच्या पत्नीला कोरियन ड्रामा सीरिज पाहण्याचे वेड आहे. आता त्यांना मुलगा झाला आहे. त्यांनी मुलाचे नाव ठेवण्यासाठी तीन कोरियन नावं निवडली आहेत.

indian couple korean drama inspired baby name kang tae moo
भारतीय मातीतील कोरियन कुलमाता

यात किम सू हीन त्रिपाठी, चोई स्यूंग ह्यो त्रिपाठी आणि कांग तै मू त्रिपाठी अशी तीन नावं निवडली आहेत. यात महिलेने तिसर्‍या नावाला पसंती दर्शवली होती. तसंच, वहिनी आणि भावासोबत झालेले चॅटचा स्क्रीनशॉटदेखील तिने शेअर केला आहे. यात तिन्ही नाव दिसत आहेत. आता सोशल मीडियावर ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. दरम्यान, मुलाचे नाव खरंच कोरियन भाषेत ठेवलं आहे का? याची मात्री पुष्टी होऊ शकली नाही.

लोकांनी या पोस्टवर विचित्र सल्ले देण्यास सुरुवात केली आहे; तर काहींनी तिची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. जे नावं तुम्ही निवडली आहेत ते के ड्रामासाठी काम करतील; मात्र जरा विचार करा तुमच्या घरगुती कार्यक्रमात तुम्ही तुमच्या मुलाला किम सू ह्यून नावाने बोलवणार का? असा प्रश्न एका युजरने केला आहे.

दुसर्‍या युजरने म्हटलं आहे की, किम, चोई, कांग हे फॅमिली नाव आहे पहिले नाव नाही. बाकी तुमची मर्जी. तर, तिसर्‍या युजरने म्हटलं आहे की, जोपर्यंत मुलगा अर्धा कोरियाई होत नाही तोपर्यंत मी माझ्या भावाला सल्ला देईन की, असं नाव ठेवू नकोस. नाहीतर शाळा कॉलेज आणि मित्र त्याला खूप चिडवतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news