Indian Chemist Honesty | भारतीय केमिस्टच्या प्रामाणिकतेने भारावली पोलंडची महिला

Indian Chemist Honesty |
Indian Chemist Honesty | भारतीय केमिस्टच्या प्रामाणिकतेने भारावली पोलंडची महिला
Published on
Updated on

नवी दिल्ली : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये, डोमिनिका पातालस-कलरा नावाच्या महिला पर्यटकाने भारतीय औषध विक्रेत्याचा (केमिस्ट) एक थक्क करणारा अनुभव शेअर केला आहे. डोमिनिका गेल्या अनेक दिवसांपासून भारतात राहत असून, त्या भारतातील अशाच चांगल्या गोष्टी सोशल मीडियाद्वारे जगासमोर आणत असतात.

डोमिनिका यांनी व्हिडीओमध्ये सांगितले की, चार दिवसांपूर्वी त्या दिल्लीतील एका मेडिकल स्टोअरमध्ये औषध घेण्यासाठी गेल्या होत्या. औषधे घेतल्यानंतर घाईगडबडीत ती पिशवी काऊंटरवरच विसरून त्या निघून गेल्या. दरम्यान, त्या दिल्लीबाहेर गेल्यामुळे लगेचच औषधे आणण्यासाठी परत जाणे त्यांना शक्य नव्हते. चार दिवसांनंतर जेव्हा त्या पुन्हा शहरात परतल्या, तेव्हा त्यांच्या मनात शंका होती की, त्यांची औषधे दुकानदाराने सांभाळून ठेवली असतील की नाही.

डोमिनिका जेव्हा केमिस्टच्या दुकानात पोहोचल्या आणि त्यांनी आपल्या औषधांबद्दल विचारले, तेव्हा दुकानदाराने त्यांची बाजूला सुरक्षित ठेवलेली पिशवी लगेच ओळखली. कोणतेही आढेवेढे न घेता किंवा प्रश्न न विचारता दुकानदाराने ती औषधांची पिशवी डोमिनिका यांच्या स्वाधीन केली. डोमिनिका यांनी व्हिडिओत आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "मला भारताच्या याच छोट्या-छोट्या गोष्टी खूप आवडतात. एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशातही लोकांमध्ये आजही प्रामाणिकपणा आणि विश्वास टिकून आहे. तो औषध विक्रेता माझी औषधे एका बाजूला ठेवून चार दिवस माझी वाट पाहत होता, हा अनुभव माझ्यासाठी खूप खास आहे. भारतात आजही लोक इतरांच्या वस्तूंची किंमत ठेवतात आणि कोणत्याही स्वार्थाशिवाय मदत करतात, म्हणूनच माझे भारतावर मनापासून प्रेम आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news