

जगभरात अनेक नैसर्गिक चमत्कार आहेत, जे पाहून लोकांना आश्चर्य वाटते. आपल्या देशातील काही सरोवरही अशीच अनोखी आहेत. ही सरोवरे हवामान आणि परिस्थितीनुसार स्वतःचा रंग बदलतात. या तलावांचा रंग बदलण्याचे कारण काय होते, चला जाणून घेऊया.
देशभरात अशी अनेक सरोवरे आहेत, ज्यांनी कधी ना कधी नक्कीच रंग बदलला आहे. सर्वात आधी आपण महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराबद्दल बोलूया. सुमारे 52,000 वर्षांपूर्वी एका उल्कापिंडाच्या धडकेमुळे हे सरोवर तयार झाले. या तलावाचे पाणी तसे हिरवे असते, परंतु सन 2020 मध्ये अचानक त्याचा रंग गुलाबी झाला होता. हे पाहून सुरुवातीला वैज्ञानिकही अचंबित झाले. मात्र, नंतर त्यांना आढळले की या सरोवरात असलेल्या शैवाल आणि मिठाच्या अधिकतेमुळे जेव्हा उन्हाळ्यात पाण्याची पातळी घटते, तेव्हा असा रंग बदलतो.
जर तलावांची चर्चा होत असेल आणि लडाखमधील पँगोंग तलावाचा उल्लेख नसेल, तर ते शक्य नाही. हा तलाव सुमारे 134 कि.मी. लांब आहे. तसा हा तलाव दिसताना निळ्या रंगाचा दिसतो, पण तो अनेकदा आपला रंग बदलतो आणि पाणी राखाडी रंगाचे होते. याच्या रंग बदलण्याबाबत वैज्ञानिकांचे मत आहे की, सूर्याची तीव—ता, आकाशातील ढगांचा प्रभाव आणि उंचीवर होणार्या हवामानातील बदलांमुळे (उतार-चढाव) या तलावाचा रंग बदलतो.
या दोन तलावांव्यतिरिक्त, तिसरा तलाव सिक्कीममध्ये आहे. सिक्कीममधील सोमगो तलाव रंग बदलण्याच्या बाबतीत चर्चेत असतो. हा तलाव हवामानानुसार आपला रंग बदलतो. असे म्हटले जाते की, हिवाळ्यामध्ये हा तलाव पूर्णपणे बर्फाने गोठतो. त्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्याचे पाणी निळ्या आणि हिरव्या रंगाचे दिसू लागते.