Cicada infection | मुलांमध्ये ‘सिकाडा’चा वाढता संसर्ग

Cicada infection |
Cicada infection | मुलांमध्ये ‘सिकाडा’चा वाढता संसर्ग
Published on
Updated on

वॉशिंग्टन : कोरोना विषाणूचा एक नवीन आणि मोठ्या प्रमाणात म्युटेशन झालेला प्रकार बीए.3.2 सध्या वैज्ञानिकांच्या अभ्यासाचा विषय ठरला आहे. ‘सिकाडा’ असे टोपणनाव मिळालेल्या या व्हेरिएंटचा विशेष म्हणजे तो प्रामुख्याने 3 ते 15 वयोगटातील मुलांमध्ये अधिक प्रमाणात आढळत आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे हा प्रकार मुलांमध्ये किंवा प्रौढांमध्ये गंभीर आजार निर्माण करत नाही.

अमेरिकेतील आणि इतर देशांतील अभ्यासानुसार, हा व्हेरिएंट 23 देशांत आढळला असून त्याचा प्रसार अजूनही मर्यादित आहे. सध्याच्या लसी या प्रकाराविरुद्ध काही प्रमाणात संरक्षण देत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे नवीन लस तयार करण्याची तातडीची गरज नसल्याचे मतही व्यक्त होत आहे.

वैज्ञानिकांच्या मते, वीए.3.2 मध्ये अनेक जनुकीय बदल झाले असले तरी त्याची संसर्गक्षमता मध्यम आहे. काही अभ्यासांमध्ये मुलांना हा व्हेरिएंट इतर प्रकारांच्या तुलनेत पाच पट अधिक संसर्गित करत असल्याचे दिसून आले आहे. यामागे मुलांची तुलनेने कमी रोगप्रतिकारशक्ती आणि शाळांमधील सततचा संपर्क कारणीभूत असू शकतो. एकूणच, “सिकाडा” व्हेरिएंट सध्या मोठा धोका नसला, तरी त्यावर सतत लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news