Presidential term: ‘या‌’ देशात राष्ट्राध्यक्षपद असते केवळ एक वर्षाचेच!

जगाच्या पाठीवर असा एक देश आहे, जिथे दरवर्षी राष्ट्राध्यक्ष बदलला जातो.
Presidential term
Presidential term: ‘या‌’ देशात राष्ट्राध्यक्षपद असते केवळ एक वर्षाचेच!Pudhari
Published on
Updated on

बर्न : जगाच्या पाठीवर असा एक देश आहे, जिथे दरवर्षी राष्ट्राध्यक्ष बदलला जातो. ही अनोखी व्यवस्था युरोपमधील अतिशय सुंदर देश असलेल्या स्वित्झर्लंडमध्ये पाहायला मिळते. येथे राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ केवळ एक वर्षाचा असतो. ही व्यवस्था नक्की काय आहे आणि त्यामागील कारण काय, हे जाणून घेऊया.

स्वित्झर्लंड आपल्या नैसर्गिक सौंदर्यासोबतच अनोख्या राजकीय व्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. येथे सत्तेचे केंद्रीकरण रोखणे आणि सामूहिक नेतृत्वाला प्रोत्साहन देणे, या उद्देशाने राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ फक्त 1 वर्षाचा ठेवण्यात आला आहे. स्वित्झर्लंडमध्ये राष्ट्राध्यक्षांची निवड थेट जनतेद्वारे केली जात नाही. तिथल्या संघीय परिषदेच्या (फेडरल कौन्सिल) 7 सदस्यांपैकी दरवर्षी एका सदस्याची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली जाते. हे पद प्रामुख्याने औपचारिक स्वरूपाचे असते. राष्ट्राध्यक्षांना येथे ‌‘समानांमधील प्रथम‌’ मानले जाते. स्वित्झर्लंडमध्ये दरवर्षी 1 जानेवारी रोजी नवीन राष्ट्राध्यक्ष आपला पदभार स्वीकारतात. ही परंपरा सत्तेचा समतोल राखण्यासाठी आणि सामायिक नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे. या व्यवस्थेची वैशिष्ट्ये : सामूहिक निर्णय : स्विस राष्ट्राध्यक्षांकडे इतर देशांच्या राष्ट्राध्यक्षांप्रमाणे व्यापक कार्यकारी अधिकार नसतात.

सर्व महत्त्वाचे निर्णय संपूर्ण ‌‘संघीय परिषद‌’ मिळून घेते. स्थैर्य : राष्ट्राध्यक्ष दरवर्षी बदलत असले, तरी धोरणात्मक निर्णय सामूहिक असल्याने देशात राजकीय स्थिरता कायम राहते. प्रत्यक्ष लोकशाही : स्वित्झर्लंडमध्ये प्रत्यक्ष लोकशाहीची परंपरा आहे. येथे जनता ‌‘जनमत संग््राहा‌’द्वारे महत्त्वाच्या निर्णयांमध्ये थेट सहभागी होते. यामुळे सरकार आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होतो. एका व्यक्तीकडे दीर्घकाळ सत्ता राहू नये आणि लोकशाहीची मूल्ये जपली जावीत, यासाठी स्वित्झर्लंडने स्वीकारलेली ही पद्धत जगासाठी आजही कुतूहलाचा विषय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news