China pollution impact Arctic | चीनमधील घटत्या प्रदूषणाचा आर्क्टिकवर विपरीत परिणाम!

China pollution impact Arctic
China pollution impact Arctic | चीनमधील घटत्या प्रदूषणाचा आर्क्टिकवर विपरीत परिणाम!
Published on
Updated on

बीजिंग : चीनने आपल्या हवेच्या गुणवत्तेत केलेली लक्षणीय सुधारणा आर्क्टिक प्रदेशासाठी अनपेक्षित परिणाम घेऊन आली आहे. एका नवीन अभ्यासानुसार, चीनमधील प्रदूषणात (एरोसोल्स) घट झाल्यामुळे वादळांची तीव्रता कमी झाली असून, त्यामुळे समुद्रातील बर्फ वितळण्याचे प्रमाण काही अंशी घटले आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते, याच प्रदूषण कणांच्या कमतरतेमुळे जागतिक तापमानवाढीचा वेग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नॉर्वेमधील ‘सिसेरो सेंटर फॉर इंटरनॅशनल क्लायमेट रिसर्च’चे वरिष्ठ संशोधक ब्योर्न सॅमसेट यांनी सांगितले की, ‘चीनी जनतेने अनेक दशके खराब हवेचा सामना केला आहे. या प्रदूषणामुळे तात्पुरत्या स्वरूपात जागतिक तापमानवाढीचा वेग मंदावला होता, ज्यामुळे जगाला बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी थोडा जास्तीचा वेळ मिळाला. आता आपण हरितगृह वायूंमुळे होणार्‍या तापमानवाढीचे पूर्ण परिणाम पाहत आहोत, ज्याचा सामना आपल्याला उशिरा का होईना करावाच लागणार होता.

‘2019च्या जानेवारी अखेरीस, उत्तर पॅसिफिक महासागरावरील वार्‍याच्या दिशेत बदल झाला आणि एकापाठोपाठ पाच शक्तिशाली चक्रीवादळे बेरिंग समुद्रात धडकली. या वादळांमुळे दक्षिणेकडून येणारे उष्ण वारे बर्फावर आदळले, ज्यामुळे बर्फाचे थर तुटून उत्तरेकडे सरकले. परिणामी, उत्तर बेरिंग समुद्रातील तापमान सामान्यपेक्षा 12 ते 16 अंश सेल्सिअसने वाढले. मार्चच्या सुरुवातीपर्यंत बर्फाचे आच्छादन 82 टक्क्यांनी आकुंचन पावले होते. सुमारे 4 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा बर्फ वितळला होता, जो उपग्रहाद्वारे नोंदवला गेलेला त्या काळातील सर्वात मोठा घसरगुंडीचा आकडा होता. ‘एनपीजे क्लायमेट अँड अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स’ या जर्नलमध्ये 18 मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

2000 ते 2014 या काळात चीनमधील कारखान्यांच्या धुराड्यातून निघणार्‍या धुरामुळे हिवाळ्यातील वादळे उत्तर पॅसिफिकमधून आर्क्टिकच्या दिशेने वळली असावीत, ज्यामुळे बेरिंग समुद्रातील बर्फ नष्ट झाला. शांघायमधील काजळी आणि सल्फेटचे कण अलास्काच्या किनारपट्टीवरील बर्फावर कसा परिणाम करतात, हे समजून घेण्यासाठी वादळाच्या कार्यपद्धतीचा विचार करावा लागतो. उत्तर गोलार्धातील हिवाळ्यातील हवामान ठरवणारी चक्रीवादळे एका उष्णता इंजिनाप्रमाणे काम करतात. समुद्राच्या पृष्ठभागाजवळील उबदार, दमट हवेचे बाष्पीभवन होते, ती वर जाते आणि ढगांमध्ये रूपांतरित होते. या प्रक्रियेत उष्णता बाहेर पडते, जी वादळाला अधिक ऊर्जा देते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news