‘आयआयटी बॉम्बे’ने बनवले प्रभावी नीडललेस इंजेक्शन

IIT Mumbai | शॉकवेव्हजवर आधारित नवी सीरिंज
IIT Mumbai Needleless Injection |
‘आयआयटी बॉम्बे’ने बनवले प्रभावी नीडललेस इंजेक्शनPudhari Photo
Published on
Updated on

मुंबई : लहान मुलांनाच नव्हे तर अनेक प्रौढांनाही इंजेक्शनची भीती वाटत असते. गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या संशोधनामुळे इंजेक्शनचं दुखणं कमी झालं असलं, तरीही इंजेक्शन घ्यायचं म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. मात्र, आयआयटी बॉम्बेच्या (मुंबईच्या) संशोधकांनी असे इंजेक्शन बनवले आहे ज्यात सुईच नसेल. आयआयटी बॉम्बेच्या एरोस्पेस अभियांत्रिकी विभागाच्या संशोधकांनी शॉकवेव्हजवर आधारित ही नवी सीरिंज तयार केली आहे. आपण जी इंजेक्शन सीरिंज वापरतो त्यापेक्षा ही वेगळी आहे. ही सीरिंज उच्च-ऊर्जा दाब लहरी (शॉक वेव्ह) वर काम करते. यातल्या शॉकव्हेज या ध्वनीच्या वेगापेक्षा वेगाने त्वचेच्या थरांमध्ये प्रवेश करतात. यामुळे इंजेक्शन सीरिंज मधलं औषध सुई नसतानाही शरीरात पोहोचतं. संशोधकांनी या सीरिंजच्या नोझलची रचना केवळ 125 मायक्रॉन म्हणजे मानवी केसांच्या जाडी इतकीच ठेवली आहे. त्यामुळे डास चावल्यावर जितका त्रास होतो त्यापेक्षा कितीतरी कमी त्रास या ‘शॉकव्हेव बेस्ड नीडल फ्री सीरिंज’मुळे होणार आहे.

संशोधकांनी ‘जर्नल ऑफ बायोमेडिकल मटेरियल्स अँड डिव्हाईसेस’मध्ये या तंत्रज्ञानाविषयीचा अहवाल प्रकाशित केला आहे. ज्यात या सीरिंजच्या मदतीने वेदना न होता इंजेक्शन मधलं औषध अगदी काही क्षणांत शरीरात पोहोचेल आणि त्वचेला इजा होणार नसल्याचा दावा केला गेला. ‘फक्त इंजेक्शनच्या सुईची भीती किंवा टोचण्याचा त्रास दूर करण्यासाठी ही सुई तयार करण्यात आली नसून, अचूक आणि वेगाने शरीरात औषध पोहोचवण्यासाठी या शॉकव्हेज सीरिंजची रचना अचूकपणे आणि अतिशय जलदपणे शरीरात औषध पोहोचवण्यासाठी केली गेली आहे,’ असा दावा संशोधकांच्या टीमने केला आहे. अनेकदा आपण असे काही रुग्ण पाहतो की जे अत्यवस्थ असतात. औषधांचा त्यांच्यावर परिणाम होत नाही किंवा योग्य वेळेत औषध शरीरात न मिसळल्याने त्यांचा प्रभाव कमी दिसून येतो. या नव्या सिरिंजच्या मदतीने अवघ्या काही सेकंदांत हे औषध शरीरात पोहोचतं आणि त्याचा प्रभावही दिसून येतो.

याशिवाय ही सीरिंज बनवणार्‍या टीमचा दावा आहे की, या सीरिंजमुळे संसर्गाचा धोकाही कमी होऊ शकतो. हाय डायबिटीस असलेल्यांना दिवसातून किमान 2 किंवा 3 वेळा इंजेक्शनद्वारे इन्सुलिन घ्यावं लागतं. अशा रुग्णांसाठी ही नवी नीडल फ्री इंजेक्शन सीरिंज फायद्याची ठरू शकेल. या संशोधनाच्या प्रमुख प्रियांका हंकारे यांच्या दाव्यानुसार, ‘वारंवार सामान्य सीरिंजचा वापर केल्याने त्वचेच्या ऊतींचं नुकसान होऊ शकतं, मात्र या नव्या सीरिंजमुळे त्वचेला कोणताही धोका निर्माण होणार नाहीये. याशिवाय योग्य ठिकाणी आणि वेगाने औषध शरीरात पोहोचवलं जाऊ शकतं. यासाठी सीरिंजच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या आहेत. सीरिंजमधलं औषध योग्यरित्या, त्वचेला आणि शरीराला कोणतीही हानी न होता पोहोचेल यासाठी सिंथेटिक त्वचेसारख्या टिश्यू सिम्युलेंटवरही सीरिंजची चाचणी केली आहे.’ फक्त इंजेक्शनच नाहीत ऑपरेशनपूर्वी आणि दरम्यान वापरली जाणारी भूल देणारी इंजेक्शन आणि अँटिफंगल औषधांसह विविध औषधांची चाचणी या सीरिंजच्या माध्यमातून उंदरांवर केली गेली. नीडल फ्री सीरिंजची परिणामत्मकता चांगली दिसून आली.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news