उत्तर प्रदेशात मंदिरातील उत्खननात सापडल्या मूर्ती, नाणी

उत्तर प्रदेशात मंदिरातील उत्खननात सापडल्या मूर्ती, नाणी
Pudhari File Photo
Published on
Updated on

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील खाटू श्याम मंदिरात खोदकाम सुरू होते. त्यावेळी खणत असताना जमिनीतून आवाज आला. कुदळी आणि फावड्याला काही तरी अडथळा ठरत असल्याचे लक्षात आल्यावर हळूहळू खोदकाम करण्यात आले. त्यानंतर अजून उत्सुकता ताणली गेली. त्यावेळी खोदकामात एक बंद पितळी डबा सापडला. त्यामध्ये काही मूर्ती, नाणी व शिक्के आढळले.

सिंगाही खूर्द येथे श्री बालाजी मंदिरात खाटू श्याम आणि हनुमान मूर्तीची स्थापना करण्यात येणार होती. त्यावेळी खोदकाम करण्यात येत होते. खोदकाम दरम्यान एक पितळेचा डबा बाहेर काढण्यात आला. त्यामध्ये पितळेचे राम पंचायतन, हनुमान यांच्यासह अन्य काही देवी-देवतांच्या मूर्ती तसेच काही नाणी सापडली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार होती. त्यासाठी जागेची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर याठिकाणी मंदिरासाठी पायाचे खोदकाम करण्यात येत होते. त्याचवेळी आवाज ऐकू आला. कुदळी आणि फावड्याला काही तरी अडथळा ठरत असल्याचे लक्षात आल्यावर हळूहळू खोदकाम करण्यात आले. ही माहिती मिळताच पोलिसही दाखल झाले. मंदिराच्या पुजार्‍याने पोलिसांकडे हा पितळेचा डबा सोपवला. पितळेचा डबा बाहेर काढण्यात आला. त्यावेळी त्यात श्रीराम पंचायतन, लक्ष्मी, गणेश, दुर्गादेवीची मूर्ती दिसली. एक त्रिशूल, बालाजीची चांदीची मूर्ती, पाच गदा, पाच शालिग्राम, 1920 आणि 1940 मधील काही शिक्के मिळाले. हे वृत्त सगळीकडे पसरले. त्यामुळे मूर्ती पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news